Full Width(True/False)

अजूनही सुशांतची वाट पाहत दारात बसतो फज, पाहा व्हिडिओ

पटणा- सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर त्याचा पाळीव कुत्रा फजसाठी त्याच्या चाहत्यांची चिंता सतत वाढ आहे. काही दिवसांपूर्वी सुशांतची बहीण श्वेताने फजचा वडिलांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आता त्याच्या भाचीने मल्लिकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर फजचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुशांतचं त्याच्या फजवर अतोनात प्रेम होतं. सुशांतच्या मृत्यूनंतर फजचा एक व्हिडिओ समोर आला होता. यात तो सुशांतचा फोटो पाहताना फार उदास दिसत होता. आता सुशांतची भाची मल्लिकाने फजची अजून एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केली आहे. फजची क्लिप शेअर करताना तिने लिहिले की, आजही दार उघडल्यावर तो आशेने त्याची वाट पाहत असतो. सुशांतच्या चाहत्यांना अजूनही विश्वास होत नाहीये की सुशांत आता या जगात नाही. त्याचा सर्वात लाडका कुत्रा फजही त्याची येण्याची सतत वाट पाहत असतो. विशेष म्हणजे सुशांत त्याच्यासोबत फजला अनेक ठिकाणी घेऊन जायचा. आउटिंगवेळीही फजने सुशांतची साथ कधी सोडली नाही. सुशांतने फजसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. दरम्यान, गुरुवारी सुशांतसिंग राजपूत याच्या कॉल रेकॉर्डचा शोध घेण्यात आला. यात अभिनेता काही मोठ्या निर्मात्यांच्या संपर्कात असल्याचं कळलं. यात १२ मिनिटांत पाच फोन कॉल केल्याचे उघडकीस आले. यात चित्रपट निर्माते निखिल अडवाणी आणि निर्माता रमेश तोरानी यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांनी स्क्रिप्टवर चर्चा केल्याचं समोर आलं. आता हिचे कॉल डिटेल्स समोर आले आहेत. टाइम्स नाऊने रिया चक्रवर्तीचे काढले आहेत. यात सुशांतहून जास्त कॉल तिने त्याची एक्स मॅनेजर श्रुती मोदीला केल्याचे कळते. यासोबतच सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडासाही तिने सर्वाधिक कॉल केले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iuV7Mf