Full Width(True/False)

मी प्रसिद्धीसाठी मनोरंजन विश्वात नाही: राधिका आपटे

मुंबई: बॉलिवूड, वेब सीरिज आणि शॉर्टफिल्मचं विश्व गाजवणारी अभिनेत्री राधिका आपटेच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या अप्रतिम अभिनेत्रीचं म्हणणं आहे की, 'मी प्रसिद्धीसाठी मनोरंजन विश्वात नाही. कधी-कधी मला शुभेच्छा आवडतात. पण, मी यश आणि अपयशाला गांभीर्यानं घेत नाही. कारण यश-अपयश हे तात्पुरतं असतं आणि सर्व अगदी सापेक्ष आहेत. पण, आपण त्याकडे दुर्लक्षही करू शकत नाही. या आपल्या प्रवासामधील महत्त्वपूर्ण बाबी आहेत. तुम्हाला स्वत:चा कौतुक करुन घेणं आवडत असेल तर अपयशातून देखील शिकता आलं पाहिजे. म्हणून मी संतुलित दृष्टिकोन ठेवला आहे'. राधिका नुकतीच नेटफ्लिक्सच्या 'रात अकेली है' या चित्रपटात दिसली होती. त्याचनिमित्ताने माध्यमांशी बोलताना या भावना व्यक्त केल्या. आपल्या उत्कृष्ट अभिनयानं विविध व्यक्तिरेखा जिवंत करणारी गुणवान अभिनेत्री अशी राधिकाची ओळख आहे. अशाच एका आगामी ' ' ( ) या आंतरराष्ट्रीय सिनेमात राधिका लवकरच दिसणार आहे. 'ए कॉल टू स्पाय'ची कहाणी वास्तववादी आहे. ब्रिटिश गुप्तहेर नूर इनायत खान ही व्यक्तिरेखा तिनं यात साकारली आहे. भूमिकेसाठी राधिकानं खूप मेहनत घेतली असून, हवा तसा परफेक्ट लुक मिळवण्यासाठी आणि आपली व्यक्तिरेखा अस्सल दिसावी यासाठी तिनं आपले केसदेखील कापून घेतले आहेत. दिग्दर्शनात पाऊल अभिनयात ठसा उमटवणारी राधिका आता दिग्दर्शनातही आपली छाप पाडू पाहतेय. राधिकानं 'स्लीपवॉकर' (sleepwalkers) या लघुपटाद्वारे दिग्दर्शनात पाऊल टाकलं आहे. तिच्या या शॉर्टफिल्मची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. 'पाल्म्स स्प्रिंग आंतरराष्ट्रीय शॉर्ट फेस्टिव्हल'मध्ये तिच्या या शॉर्ट फिल्मला पुरस्कार जाहीर झालाय. या लघुपटाला 'बेस्ट मिडनाइट शॉर्ट पुरस्कार' मिळाला असून, या लघुपटासाठी कथालेखनही तिनं केलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधिका म्हणाली, की 'शॉर्टफिल्मच्या दिग्दर्शनाच्या कामाचा मी खूप आनंद घेतला. मी याबद्दल खूपच उत्सुक आहे. प्रेक्षकांना ही शॉर्टफिल्म लवकरच पाहता येणार आहे. दिग्दर्शक म्हणून मला आणखी काम करण्याची संधी मिळेल.' या लघुपटात शहाना गोस्वामी आणि गुलशन देवैया यांच्या मुख्य भूमिका आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31tlDPa