Full Width(True/False)

जिओ, एअरटेल, वोडाः मोठ्या वैधतेच्या स्वस्त प्लानमध्ये कोण बेस्ट?

नवी दिल्लीः वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांनी युजर्सची गरज लक्षात घेऊन खूप सारे प्लान ऑफर केले आहेत. अनेक प्लानमध्ये हेवी डेटा युजर्संसाठी डिझाईन करण्यात आले आहेत. काही प्लानमध्ये कमी तर काही प्लानमध्ये कमी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग दिली आहे. तसेच जास्त युजर्स ड्यूल सिम फोनचा वापर करीत आहे. त्यामुळे मोठी वैधता देणारे स्वस्त प्लान हवे असल्यास जिओ, एअरटले आणि वोडाफोन कंपनीकडे वेगवेगळे प्लान आहेत. वाचाः रिलायन्स जिओ जिओकडे दोन स्वस्त प्लान आहेत. पहिला प्लान ३२९ रुपयांचा आहे. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. यात एकूण ६ जीबी डेटा मिळतो. जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. अन्य नेटवर्क्सवर कॉलिंग करण्यासाठी या प्लानमध्ये ३००० मिनिट्स मिळतात. यात १००० एसएमएस मिळते. जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन दिले जाते. जिओचा दुसरा प्लान १२९९ रुपयांचा आहे. यात ३३६ दिवसांची वैधता मिळते. हा प्लान एकूण २४ जीडी डेटा ऑफर करतो. जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी १२ हजार मिनिट दिले जाते. एकूण ३६०० फ्री एसएमएस तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः भारती एअरटेल एअरटेल युजर्संना दोन प्रीपेड प्लान मिळत आहे. ज्यात मोठी वैधता आणि फ्री कॉलिंग बेनिफिट्स मिळतात. पहिला प्लान ३७९ रुपयांचा आहे. यात एकूण ६ जीबी डेटा मिळतो. तसेच सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळते. युजर्संना Airtel Xstream Premium चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. दुसरा प्लान हा १४९८ रुपयांचा आहे. यात ३६५ दिवसांची वैधता मिळते. यात एकूण २४ जीबी डेटा युजर्संना मिळतो. रोज १०० फ्री एसएमएस मिळते. प्लानमध्ये सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळते. युजर्संना Airtel Xstream Premium चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वोडाफोन कंपनीचे ३७९ रुपये आणि १४९९ रुपयांचे दोन प्लान आहेत. या प्लानमध्ये मोठी वैधता मिळते. पहिला प्लान ३७९ रुपयांचा आहे. यात युजर्संना एकूण ६ जीबी डेटा आणि १००० फ्री एसएमएस मिळते. या प्लानमध्ये सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. याची वैधता ८४ दिवसांची आहे. वाचाः दुसरा प्लान हा १४९९ रुपयांचा आहे. यात ३६५ दिवसांची वैधता मिळते. यात एकूण ३६०० फ्री एसएमएस मिळतात. एकूण २४ जीबी डेटा मिळतो. सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. वोडाफोनच्या दोन्ही प्लानवर वोडाफोन प्ले आणि झी ५चे प्रीमियमचे फ्री सब्सक्रिप्शन युजर्संना मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kZJheL