Full Width(True/False)

भारतीय अॅपची जबरदस्त कमाल, १५ कोटींहून अधिक डाउनलोड

नवी दिल्लीः भारताचा पहिला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप आरोग्य सेतू १५० मिलियन म्हणजेच १५ कोटी डाउनलोड्स झाला आहे. ने अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट करुन याची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये सांगितले की, २ एप्रिल २०२० ला लाँच करण्यात आल्यानंतर आतापर्यंत हे अॅप १५ कोटी युजर्सचा आकडा पार केला आहे. भारत सरकारने या अॅपला अनेक संस्थासाठी बंधनकारक केले आहे. तसेच अनेक राज्यात सार्वजनिक संस्था तसेच मॉल, सुपरमार्केट मध्ये प्रवेश करण्यासाठी सुद्धा हे अॅप बंधनकारक आहे. वाचाः टर्की आणि जर्मनीच्या अॅपला मागे टाकले डाउनलोड्समध्ये आरोग्य सेतू अॅपने टर्कीच्या पेंडेमिक आयसोलेशन ट्रेकिंग अॅप आणि जर्मनीच्या करोना वॉर्न अॅपला मागे टाकले आहे. या दोन्ही अॅपला अनुक्रमे १.१ कोटी आणि १.०४ कोटी वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. Sensor Tower ने आपल्य एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली होती. वाचाः जगातील सर्वात जास्त डाउनलोड करण्यात आलेले ट्रेसिंग अॅप आरोग्य सेतू जगातील सर्वात जास्त डाउनलोड करण्यात येणारा कॉन्टॅक्ट अॅप बनले आहे. याला जपानच्या COCOA आणि इंडोनेशिया च्या PeduliLindungi अॅपला मागे टाकले आहे. वाचाः असे काम करतो आरोग्य सेतू अॅप आरोग्य सेतू अॅप अँड्रॉयड स्मार्टफोन्स आणि आयफोन दोन्हीसाठी उपलब्ध आहे. हे अॅप ब्लूटूथ, लोकेशन आणि मोबाइल नंबरच्या मदतीने चेक करतो की तुम्ही अशा व्यक्तीच्या संपर्कात आला नाहीत ज्याला करोना संसर्ग झाला आहे. अॅपमध्ये महत्त्वपूर्ण माहिती, कोविड १९ हेल्प सेंटर्स आणि सेल्फ असेसमेंट टेस्ट याचा समावेश आहे. यावरून तुम्ही चेक करु शकता तुमच्यावर या संसर्गाचा धोका तर नाही ना. आरोग्य सेतू अॅप इन्स्टॉल केल्यानंतर पहिल्यांदा याला ओपने केल्यास काही परमिशन मागितले जाईल. हे अॅप आपला मोबाइल नंबर, ब्लूटूथ आणि लोकेशन डेटाच्या मदतीने माहिती होते की, तुम्ही सुरक्षित आहात की तुमच्यावर संसर्गाचा धोका कायम आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fSuZZI