Full Width(True/False)

सुशांतच्या अकाउंटवरून पूजेसाठी काढण्यात आले २.९३ लाख

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याचे गुढ कमी होण्याऐवजी वाढतच चाललं आहे. सुशांतच्या वडिलांनी विरोधात पटणा येथे एफआयआर दाखल केली. आता या केसमध्ये कुटुंबियांनी रिया जादूटोणा करत असल्याचा संशय व्यक्त केला. रिपोर्टनुसार, कुटुंबियांना जवळपास २.९३ लाखांचं ट्रॅन्जॅक्शन झाल्याचं दिसलं. हे पैसे पूजेसाठी वापरण्यात आले होते. कुटुंबियांच्या मते कोणती पूजा झालीच नाही. कुटुंबियांना आता वाटतं की सुशांतवर जादूटोणा करण्यात आला होता. २०१९ मध्ये होणार होती पूजा टाइम्स नाउच्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या कुटुंबियांनी दावा केला आहे की, त्याच्या अकाउंटमधून दोन महिन्यात २ लाखांहून जास्त रुपये पूजेसाठी काढण्यात आले. ही पूजा २०१९ मध्ये होणार होती. या बँक अकाउंटची नॉमिनी सुशांतची बहीणच आहे. याचमुळे अकाउंट डिटेल समोर आले. सुशांतला त्याचा छोट्यात छोटा खर्च लिहून ठेवायची सवय होती. रियासाठी बाहेरून जेवणं आणलं तरी त्याची नोंद तो ठेवायचा. मग याच ट्रॅन्जॅक्शनची नोंद कशी ठेवली गेली नाही. त्याचमुळे हा खर्च कुठे झाला हे कळू शकलेलं नाही. स्वयंपीनेही दिली होती जादूटोण्याची बातमी सुशांतची बहीण मीतू सिंहची प्रतिक्रियाही समोर आली होती. यात मीतूला सुशांतच्या कूकने रिया जादूटोणा करायची असं सांगितलं होतं. राजपूत कुटुंबियांनी रियावर आरोप केला आहे की तिने सुशांतल्या त्याच्या कुटुंबियांपासून दूर केलं. दरम्यान, केंद्रीय मंत्री आरके सिंह यांनी सुशांत राजपूतच्या केसची सीबीआय चौकशी व्हावी असं मत स्पष्ट केलं आहे. यासोबतच उद्धव सरकार असं करू देत नसल्याचंही ते म्हणाले. याआधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही स्पष्ट केलं होतं की, राजपूत कुटुंबियांनी जर सीबीआय चौकशीची मागणी केली तर यावर विचार केला जाऊ शकतो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iexp6P