मुंबई: अभिनेता यांच्या आत्महत्येचं प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होताना दिसत आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत दाखल झाली आहे. यानंतर आज मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. पूर्व मॅनेजर हिच्या आत्महत्येचा सुशांतला मोठा धक्का बसला होता. तिच्या आत्महत्येसंदर्भात नाव घेतलं जाईल, अशी भीती आतल्या आत त्याला खात होती. तिच्या आत्महत्येनंतर तो आणखी नैराश्यात गेला होता. १४ जूनला आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं गुगलवर स्वत:चं नाव सर्च करत त्याच्याबद्दल काय -काय लिहिण्यात आलं हे वाचलं होतं. त्यानंतर त्यानं 'painless death',(वेदनारहित मृत्यू) असंही सर्च केलं होतं. त्यामुळं ही आत्महत्याचं आहे, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. डिलीट झाली दिशा सालियनची फाइल? एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या अँगलने सुशांतच्या मृत्यूची चौकशी करत आहे. याचसंबंधी पटणा पोलिसांनी मुंबई पोलिसांकडे दिशा सालियनची फाइल मागितली. असं म्हटलं जातं की, मुंबई पोलीस या संबंधीची फाइल बिहार पोलिसांना देणार होते. मात्र त्यांना एक अज्ञात फोन आला आणि त्यांनी दिशाच्या केस फाइलचा फोल्डर डिलीट झाल्याचं उत्तर दिलं. लॅपटॉप देण्यासही नकार या रिपोर्टमध्ये असेही म्हटलं आहे की, बिहार टीमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लॅपटॉपमधून डिलीट झालेली फाइल परत मिळवता येऊ शकते. पण त्यासाठी लॅपटॉप देण्यासही मुंबई पोलिसांनी नकार दिला. यासोबत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी बिहार पोलिसांच्या टीमला या केसपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सुशांतसिंह राजपूतचे वडील यांच्यावतीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पटणात एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत आली. याशिवाय या प्रकरणाची ईडीकडूनही चौकशी करण्यात येणार आहे. सुशांतसिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथील त्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. पण त्याने ही आत्महत्या का केली या मागची कारणं सध्या शोधण्यात येत आहेत. आतापर्यंत ४१ हून अधिक लोकांचे यासंबंधीचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यात सुशांतच्या कुटुंबियांपासून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2D4uVJh