मुंबई- सीबीआयने सुशांतसिंह राजपूतसोबत काम करणाऱ्या आणि त्याच्या घरी राहणाऱ्या लोकांची कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे. दिपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा आणि जया सहा यांच्यासोबतचे रियाचे चॅट्स समोर आले आहेत. अमली पदार्थांचा नवा अँगलही यात समोर आला आहे. दरम्यान, सुशांतचं घर सोडण्यापूर्वी रियाने हार्ड ड्राईव्ह नष्ट केल्याचं पिठाणीने सांगितलं. भांडणाचीही गोष्ट आली समोर टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीने सीबीआयच्या चौकशीत मान्य केलं की, ८ जून रोजी रियाने सुशांतच्या हार्ड ड्राईव्ह नष्ट केल्या आणि त्याच दिवशी सुशांतचं घर सोडलं. ८ जूनला दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. रियाने घर सोडल्यानंतर सुशांतला ब्लॉकही केलं होतं. अमली पदार्थांसंबंधीही सुरू होणार चौकशी रियाच्या व्हायरल चॅटमधून ड्रग्जशी संबंधित अनेक गोष्टी समोर आले आहेत. रिया सुशांतला अमली पदार्थ द्यायची हे आता उघड झालं आहे. यानंतरच नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोनेही बुधवारी रियाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी नारकोटिक्स ब्युरोच्या टीमकडून यासंबंधीची कारवाई करण्यात आली. आता याचीही चौकशी मुंबईत सुरू होणार आहे. कुटुंबियांचा आरोप रियाने केली हत्या दुसरीकडे सुशांतसिंह राजपूतचे वडील केके सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांचा ठाम विश्वास आहे की रियाने सुशांतला ड्रग्जचे ओव्हरडोज देऊन मारले. सुशांतच्या वडिलांनी यासंबंधी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की रियाने त्यांच्या मुलाची हत्या केली आहे आणि तिला शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणात, मनी लॉन्ड्रिंगच्या दृष्टीनेही ईडी तपास करत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QtaXLb