मुंबई: याच्या मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपी असलेली अभिनेत्री हिनं नुकतीच एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली असून या मुलाखतीत तिनं अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. सुशांतच्या डिप्रेशनबद्दल बोलताना रियानं अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सुशांतच्या मृत्यूला रिया जबाबदार असल्याचं म्हटलं जात असताना तिनं वृत्त वाहिनीला दिलेली मुलाखत महत्त्वाची ठरत आहे. या मुलाखतीत तिनं तिच्यावर करण्यात आलेल्या अनेक गोष्टींवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असून सुशांतच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. एक धक्कादायक खुलासा रियानं या मुलाखतीदरम्यान केलाय,तो म्हणजे सुशांत गेल्या वर्षी पासून नव्हे तर २०१३ पासून डिप्रेशनमध्ये होता, असं रियानं म्हटलं आहे. २०१३ मध्ये सुशांतसोबत असं काही घडलं होतं, तेव्हापासूनत तो डिप्रेशनमध्ये होता. त्यानं तेव्हा एका मानसोपचार तज्ञाची भेट घेतली होती, असं रियानं सांगितलं आहे. सुशांतवर प्रेम केलं ही एकच चूक केली सुशांतवर मनापासून प्रेम केलं, ही एकच चुक केल्याचं रियानं या मुलाखतीत म्हटलं आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपास कोणीही करो, मला काहीच फरक नाही, कारण माझ्याकडं लपवण्यासारखं काहीच नाही,असंही रियानं म्हटलं आहे. च्या आत्महत्या प्रकरणाचा गुंता वाढतच चालला आहे. या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. सुशांतसिंह राजपूतचा १४ जून मृत्यू झाला होता. सीबीआय आणि ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सीबीआयने सुशांतच्या घरी जाऊन पुन्हा क्राइम सीन रि-क्रिएट केला. तर ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ-वडिलांकडे चौकशी केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. प्रकरणी आता नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) लवकरच चौकशी सुरू करणार आहे. सुशांत प्रकरणात अंमली पदार्थांचा काही संबंध आहे, याची चौकशी एनसीबीकडून करण्यात येईल. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे संचालक राकेश अस्थाना यांनी ही माहिती दिलीय. 'आम्ही सुशांत प्रकरणाची चौकशीही सुरू करत आहोत', असं एनसीबीकडून सांगण्यात आलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34EwbOC