Full Width(True/False)

आलियाच्या 'सडक २'च्या ट्रेलरवर डिसलाइकचा भडिमार

मुंबई: आधीच लॉकडाउनचं संकट आणि त्यातून , मक्तेदारीवरुन सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप यामुळे बॉलिवूडचं वातावरण ढवळून निघालं आहे. घराणेशाहीवरुन नवनवीन मतं पुढे येत आहेत. स्टारकिड्सवर टीका होतेय, स्टारकिड्सही यावरुन बोलू लागले आहेत. अशातच अभिनेत्री आलिया भट्टच्या बहुप्रतिक्षित '' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. घराणेशाहीवरुन सुरू असलेला वाद ताजा असल्यानं या ट्रेलरवर डिसलाइकचा भडिमार करण्यात येत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट हिला ट्रोल केलं जातंय. 'तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही स्टारकिड्सचे चित्रपट पाहू नका' असं विधान करिना कपूरनं अलीकडेच एका मुलाखतीत केलं होतं. काही दिवसांपूर्वी आलियानं ट्रोलिंगला कंटाळून तिचा कमेंट बॉक्स सगळ्यांसाठी बंद केला होता. त्यामुळे चाहत्यांनी तिला चांगलंच सुनावलं आहे. 'आलिया तू तुझं केमेंट सेक्शन बंद केलं आहेस. तुला आमचं मत जाणून घ्यायचं नाही आणि आम्ही तुझा चित्रपट पाहायला जायचं, असं कसं चालणार?' असा सवाल अनेकांनी आलियाला केला आहे. तशा पोस्ट काहींनी केल्या आहेत. यापूर्वी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं तेव्हा 'सडक २' चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात आली होती. 'सडक २' या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शक महेश भट्ट यांनी तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शन केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33XaZmp