Full Width(True/False)

जॉनी लिव्हर यांनी अभिनेते महमूद यांना दिलं आहे 'हे' वचन

मुंबई: प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, स्टँडअप कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात करणारे, 'विनोदाचा बादशहा' यांचा आज . गेल्या काही वर्षांत त्यांनी काम थांबवल होतं, दीर्घकाळ ब्रेक घेतला होता. पण आता ते पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘तुमची सादरीकरणाची ऊर्जा संपली, विचार आणि कल्पनाशक्ती खुंटली, की कमरेखालच्या दर्जाहीन विनोदाकडे तुम्ही वळता. विनोद हा निखळ, निर्मळ आनंद देणारा असावा. मधल्या काळात मला व्हल्गर म्हणता येतील अशा भूमिकांसाठी विचारणा झालेली. म्हणूनच काम थांबवल होतं,’ विनोदवीर जॉनी लिव्हर त्यांच्या दीर्घकाळ घेतलेल्या ब्रेकबद्दल सांगतात. तसंच ,गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटात खूप व्यग्र होतो. त्यामुळं तेव्हा जसा वेळ मिळेल तेव्हा संधी घ्यायचो. आता मी मोजकं, मला आवडेल, पटेल असं आरामात काम करण्यावर भर देतोय. टीव्ही, चित्रपट, स्टेज या प्रत्येकाचं वेगळं स्थान आहे. त्याचा आदर राखला जावा असं वाटतं, असंही ते म्हणतात. खलनायकाकडूनही विनोद करून घेतला जातो आजकाल चित्रपटांमध्ये खलनायकाकडूनही विनोद करून घेतला जातो. हा काळाचा महिमा आहे. विनोदासाठी पूर्वी स्वतंत्र कलाकारांना कथेत, चित्रपटात स्थान असायचं. आता कुणाकडूनही विनोद करून घेतला जातो. विनोद ही खायची गोष्ट नाही, त्यावर खूप गांभीर्यानं काम करावं लागतं. विनोदी अभिनेता हा शिक्का मारून सगळे रिकामे होतात. हा ट्रेंड किती दिवस चालतो, ते पाहायचं.असं मत जॉनी लिव्हर यांनी व्यक्त केलं होतं. तो प्रयत्न फसला मराठीसह तुलू, कन्नड, गुजराती, तेलगू या भाषांमधल्या चित्रपटांसह कार्यक्रमांमध्ये जॉनी लिव्हर यांनी काम केलं आहे. यानंतर त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला होता. अभिनेता गोविंदाला घेऊन ते चित्रपट करणार होते, मात्र ते बारगळलं. तो आपला प्रांत नाही, हे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते महमूद यांनी जॉनी लिव्हर यांच्याकडून काहीही कर पण निर्मितीच्या फंदात पडू नको, असं वचन घेतलं आहे. प्रेरणादायी प्रवास लिव्हर यांचं मुळ नाव जॉनी प्रकाश आहे. मिमिक्री स्टार म्हणून ते अधिक लोकप्रिय आहेत. आंध्रप्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला असून जॉनी यांचे वडील प्रकाश राव जनमूला हिंदुस्तान लीवर फॅक्टरीमध्ये कामाला होते. मिमिक्री करण्यात निपूण असल्यामुळं जॉनी अनेक स्टेज शो करायचे. स्टेज शो करत असतानाच सुनील दत्त यांची नजर त्यांच्यावर पडली आणि दत्त यांनी जॉनी यांना सिनेमात काम करण्याची ऑफर दिली.जॉनी लिव्हर यांनी आतापर्यंत ३५० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांना १३ वेळा फिल्मफेअरमध्ये नामांकन मिळालं आहे. जॉनी यांचं कुटुंब अत्यंत गरीब होतं. आर्थिक अडचणीमुळे जॉनी सातवीपर्यंतच शिकू शकले. जॉनी सुरुवातीला गल्ल्यांमध्ये फिरून पेन विकायचे. त्यानंतर वडिलांसोबत हिंदुस्तान लीवरमध्ये कामाला लागले. इथंही ते अभिनय आणि कॉमेडीने लोकांना हसवायचे. इथल्याच लोकांनी जॉनी लिव्हर हे नाव दिलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2E0kC91