नवी दिल्लीः भारत सरकारने जवळपास १० दिवसांपूर्वी चीनवर दुसरा डिजिटल स्ट्राईक करीत ४७ चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टच्या माहितीनुसार, या ४७ अॅप्स मध्ये बाईटडान्सच्या व्हिडिओ एडिटिंग अॅप CapCut आणि शाओमीच्या ब्राउझर अॅप्स सह जवळपास १५ नवीन अॅप्स होते. या यादीत बाकी सर्व अॅप्सवर सरकारने आधीच बंदी घातली होती. जून मध्ये सरकारने देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकतो, असे सांगून टिकटॉक, हेलो सह ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर अनेक अॅप्सचे लाइट व्हर्जन आले होते. वाचाः या १५ अॅप्सवर बंदी घातली बंदी घातलेल्या ४७ अॅप्सच्या यादीत फोटो एडिटर AirBrush, शॉर्ट व्हिडियो टूल Meipai, कॅमेरा अॅप BoXxCAM यासारख्या नवीन अॅप्सचा समावेश होता. चीनच्या स्मार्टफोन आणि सेल्फी अॅप बनवणारी कंपनी Meitu च्या मालकीचे अॅप्स होते. याच कंपनीचा Meitu अॅपवर जूनमध्ये बंदी घातली होती. वाचाः तसेच ई-मेल सर्विस अॅप NetEase, QuVideo Inc चे गेमिंग अॅप Heroes War आणि SlidePlus यासारख्या अॅप्सचा समावेश होता. Mi Community अॅपला ब्लॉक केल्यानंतर शाओमीचा मी ब्राउजर प्रो सुद्धा बॅन केला होता. तसेच या प्रकारे Baidu Search आणि Search Lite वर सुद्धा बंदी घातली होती. वाचाः बंदी घातलेले क्लोनिंग अॅप्स ४७ अॅप्समध्ये क्लोनिंग अॅप होते. एकट्या Parallel Space अॅप्सचे जवळपास ७ व्हर्जन हटवले आहेत. हे अॅप अँड्रॉयड युजर्सला व्हॉट्सअॅप आणि फेसबुक यासारखे अॅप्सवर एकाच डिव्हाईसमध्ये दोन अकाउंट चालवण्याची सुविधा देते. प्रसिद्ध चायनीज मीडिया प्लॅटफॉर्म Weibo ला ही ब्लॉक केले आहे. यात Tiktok Lite, Helo Lite, SHAREit Lite, BIGO LIVE Lite, आणि VFY Lite चा समावेश होता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39Xn6AP