Full Width(True/False)

ज्या लोकांनी आमचे सिनेमे पाहिले तेच आता टीका करतायत: करिना कपूर

मुंबई टाइम्स टीम बॉलिवूडमध्ये सध्या घराणेशाहीवरुन वाद रंगतोच आहे. परिणामी , , सोनम कपूर यांच्यासह अनेक स्टार किड्सना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. या वादात अभिनेत्री हिनंही आता उडी घेतली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत तिनं सांगितलं की, 'नेपोटिझमचा विषयच मला विचित्र वाटतो. स्टार बनवण्याची किंवा तोडण्याची ताकद प्रेक्षकांकडे आहे. माझं २१ वर्ष सुरू असलेलं काम फक्त माझ्या नातलगांमुळे झालं नसतं. ते शक्य नाही. अनेक सुपरस्टार्सच्या मुलांची मी यादी देऊ शकते, की ज्यांना या मार्गाने यश मिळू शकलेलं नाही. संघर्ष मलाही करावाच लागला.' करीना कपूरची बहीण करिश्मा कपूरनं करीनाच्या आधी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. या दोघींचे आई-वडिलही या इंडस्ट्रीतलेच. या पार्श्वभूमीबद्दल करीना म्हणाली, 'हे कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल, पण मलाही संघर्ष करावा लागला. खिशात केवळ १० रुपये घेऊन येणाऱ्या व्यक्तीइतका तो रंजक असणार नाही. होय, ते तसं झालं नाही आणि याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करू शकत नाही.' करीनाच्या मते, कोण स्टार बनावा, कोण नाही याचा अंतिम निर्णय प्रेक्षक घेतात. आपलं म्हणणं स्पष्ट करताना तिनं अक्षयकुमार आणि शाहरुख खान या आऊटसाइडर्सचं उदाहरण दिले, जे या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. 'प्रेक्षकांनी आम्हाला बनवलं आहे, इतर कुणीही बनवलं नाही. तेच लोक बोट दाखवून इशारा करीत आहेत, केवळ काही मंडळी नातेवाईकांना स्टार्स करतात. त्यामुळे मला ही संपूर्ण चर्चाच विचित्र वाटते,' असं करीना म्हणाली. 'आम्हीदेखील खूप मेहनत केली आहे. आलिया भट्ट असो की करिना कपूर, आम्ही या क्षेत्रात काम करताना खूप परिश्रम घेतले आहेत. तुम्ही आम्हाला पाहता आणि आमचे चित्रपट एन्जॉय करता. त्यामुळे प्रेक्षकच आम्हाला घडवू शकतात किंवा रोखू शकतात; असंही ती पुढे म्हणाली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3foB1kI