Full Width(True/False)

ब्रेकअपनंतर अंकितावर झालेले 'हे' गंभीर आरोप; सुशांत धावला होता मदतीला

मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या आत्महत्येनंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड देखील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दोघांच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा बोललं जात आहे. दोघांचा ब्रेकअप झाला नसता तर सुशांत आज जगात असता,असं चाहते बोलत आहेत. तब्बल सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर अंकिता आणि सुशांतनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळं सर्वांनाच धक्का बसला होता, 'पवित्र रिश्ता' या मालिकेत सुशांत आणि अंकिता एकत्र काम करत होते. त्यानंतर सुशांतनं मालिका सोडली आणि तो बॉलिवूडमध्ये गेला. तिथं स्थिरावण्यासाठी त्यानं जोरदार प्रयत्न सुरू केले. या दरम्यानच दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर २०११मध्ये एका डान्सरिअॅलिटी शोमध्ये सुशांतनं अंकिताला मागणी घातली होती. तिनंही त्याला होकार दिला. आपण लवकरच लग्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण काही दिवसानंतर एका पार्टीमध्ये अंकितानं सुशांतला एक सणसणीत थोबाडीत दिल्याच्या बातम्यांनी खळबळ उडवून दिली होती. पण त्यानंतर दोघांनीही या घटनेचा इन्कार केला होता‘आमच्यात असं काही झालेलंच नाही. आम्ही पूर्वीसारखेच एकमेकांच्या गाढ प्रेमात आहोत. आमच्याविषयी असं काहीतरी छापणाऱ्या लोकांची तर आम्हाला कीवच येते.’असं या दोघांचं म्हणणं होतं. पण काही दिवसांतच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअपनंतर देखील अंकिता आणि सुशातनं दोघांचा आदरच केला. एकमेकांबद्दल कधी उलटसुलट वक्तव्य किंवा आरोप केले नाही. त्यांच्या नात्याची ही जमेची बाजू होती. ब्रेकअपनंतर अंकितावर आरोप करण्यात येत होते. अंकिताला दारुचं व्यसन लागलं होतं, ती सतत सुशांतवर संशय घ्यायची म्हणून दोघांचा ब्रेकअप झाला, असंही म्हटलं गेलं होतं. तसंच सुशांतची इतर मुलींसोबत जास्त जवळीत असायची त्यामुळं अंकितानं नातं तोडण्याचा निर्णय घेतला, अशा चर्चा होत्या. त्यानंतर सुशांतनं एक ट्विट करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. 'ना तिला दारुचं व्यसन जडलं होतं ना, मी दुसऱ्या मुलींच्यापाठी होतो, दुर्दैवानं लोकं हे पसरवत आहेत, असं ट्विट सुशांतनं केलं होतं. सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकी जैन आला. अंकितानं काही महिन्यांपूर्वीच विकीसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. दोघांचा साखरपुडा देखील झाला असल्याच्या चर्चा आहेत. सुशांतच्या निधनानंतर विकीवर देखील नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्यामुळं त्यानं सोशल मीडियावरंच कमेंट सेक्शन बंद केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2EVDruJ