पटणा- सुशांतसिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओमार्फत त्यांनी फेब्रुवारीमध्ये मुंबई पोलिसांना भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेसाठी सावध केल्याचं म्हटलं होतं. यात त्यांनी मुलाच्या जीवाला धोका असल्याचंही सांगितलं होतं. मुंबई पोलिसांनी यावर काहीच केलं नाही असा आरोप यावेळी केके सिंह यांनी केला. यानंतर मुंबई पोलिसांनीही यासंबंधीची कोणतीही तक्रार त्यांना मिळाली नसल्याचं सांगितलं. आता सुशांतच्या कुटुंबियांनी व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यात सुशांतचे भावोजी आणि मुंबईचे आयपीएस ऑफिसर परमजीत सिंग दहिया यांच्यातलं संभाषण आहे. ओपी सिंह हे हरियाणा पोलिसांचे वरिष्ठ आयपीएस ऑफिसरही आहेत. एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सुशांतच्या भावोजींनी व्हॉट्सअप चॅट केलं होतं. मात्र या स्क्रीनशॉटमध्ये जाणीवरपूर्वक हे चॅट कोणाला केलं ते लपवण्यात आलं आहे. स्क्रीनशॉटनुसार, १९ फेब्रुवारीला परमजीत सिंग दहिया यांना मेसेज केला होता की, घरातल्यांमध्ये तो सर्वांचा लाडका आहे आणि त्याच्यासाठी त्याची बहीण काळजीत आहे. दुसऱ्या मेसेजमध्ये लिहिले की, 'काही दिवसांपूर्वी रिया त्याच्या घरी रहायला गेली. त्याच्या नैराश्यावर उपचार करण्यासाठी रिया आणि तिचं कुटुंब त्याला विमानतळाच्या शेजारील एका रिसॉर्टमध्ये घेऊन गेले आणि तीन महिने त्याला तिथेच ठेवलं. तेव्हापासून त्याचे सर्व व्यवहार तेच पाहत आहेत.' अजून एका मेसेजमध्ये सुशांतच्या कुटुंबियांनी लिहिले की, 'त्याचा वर्गमित्र बुद्धा त्याच्यासोबतच आहे. तो तुम्हाला भेटेल. तो स्वतःलाच काही इजा करून घेईल... असं होता कामा नये..' पुढे सुशांतच्या कुटुंबियांनी लिहिलं की, 'जेव्हा प्रकरण वाढलं तेव्हा तो आमच्याकडे येऊन दोन- तीन दिवस राहिला. नंतर शूटिंगचं कारण देऊन तो निघून गेला.' दुसऱ्या मेसेजमध्ये त्यांनी लिहिले की, 'तो पुन्हा तिथे गेला कारण रियाने सुशांतच्या आसपासचे प्रामाणिक लोकांना काढून टाकलं होतं आणि स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना ठेवलं होतं. त्याची तिसरी बहीण दिल्लीत वकील आहे. ती अनेकदा त्याच्यासोबत रहायची आणि त्याला भेटायलाही जायची. ती त्याला पाहून घाबरायची. कारण त्याच्या आजूबाजूला असे लोक होते ज्यांनी त्याच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवलं होतं. त्याने जणूकाही आत्मसमर्पण केलं आहे. त्याच्या जीवाला धोका आहे.' याआधी सुशांतचा जवळचा मित्र सिद्धार्थ पिठानीने ओपी सिंह यांच्यासोबतचे व्हॉट्सअप चॅट शेअर केले. सिद्धार्थने जे मेसेजे शेअर केले त्यानुसार सुशांत त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात नसल्याचं स्पष्ट जाणवत होतं. ओपी सिंह फेब्रुवारीमध्ये मुंबईत आले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kaeN9E