नवी दिल्लीः स्मार्टफोन मेकर कंपनी रियलमीने आपल्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज दिली आहे. कंपनीने Realme Days नावाचा एक सेल सुरू केला आहे. या सेलला ६ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. हा सेल १० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये ग्राहाकांना स्मार्टफोन पासून फिटनेस ब्रँड पर्यंत वेगवेगळ्या रियलमी प्रोडक्ट्सवर डिस्काउंट दिला जात आहे. ग्राहकांना कंपनीची अधिकृत वेबसाईट realme.com शिवया अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट साईट्सवर या सेलचा फायदा घेता येणार आहे. वाचाः रियलमीच्या या सेलमध्ये खास करुन तीन प्रॉडक्ट्स- स्मार्टफोन, कंपनीचा फिटनेस बँड Realme Band आणि वॉयरलेस इयरबड्स Realme वर सूट दिली जात आहे. डिस्काउंट शिवाय अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर वेगवेगळ्या बँक कार्ड्सवर १० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. वाचाः Realme X2 Pro या सेलमध्ये Realme X2 Pro स्मार्टफोनवर ३ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या सूट नंतर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या मॉडलला २८ हजार ९९९ रुपये आणि १२ जीबी प्लस २५६ जीबी मॉडलला ३२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ५० वॉट सुप VOOC फ्लॅश चार्जिंग देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, फोनला ३५ मिनिटात फुल चार्ज करता येवू शकते. वाचाः Realme Band या सेलमध्ये रियलमी फिटनेस बँडवर २०० रुपयांची सूट दिली जात आहे. या सूटनंतर रियलमी बँडला १२९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. यात मोठा कलर डिस्प्ले, हार्ट रेट मॉनिटरिंग, यूएसबी डायरेक्ट चार्जिंग, स्मार्ट नोटिफिकेशन, स्पोर्ट्स ट्रॅकिंग यासारखे फीचर्स मिळतात. Realme Buds Air Neo हा कंपनीचा ट्रू वायरलेस इयरफोन्स आहे. यावर कंपनी ५०० रुपयांची सूट देत आहे. यानंतर रियलमी बड्स एयर नियोला २४९९ रुयपांत खरेदी करता येवू शकते. यात डायनामिक बेस, ब्लूटथू ५.० सपोर्ट, लो लेटेंसी गेमिंग मोड यासारखे फीचर्स मिळणार आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PwJbNo