Full Width(True/False)

...तर पहिल्यांदा सुशांत भरत असलेले अंकिताच्या घराचे हप्ते थांबवले असते; रियाचा निशाणा

मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता मृत्यू प्रकरणात रोजनवीन घडामोडी घडत आहेत. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेली सुशांतची गर्लफ्रेंड हिची एक मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या मुलाखतीदरम्यान रियानं सुशांतच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला असून तिनं सुशांतची गर्लफ्रेंड हिच्यावरही निशाणा साधला आहे. गेल्या चार वर्षांपासून सुशांत आणि अंकिता संपर्कात नव्हते, असं असताना अंकिता अचानक त्याच्याबद्दल का बोलतेय, असा प्रश्न रियानं उपस्थित केला आहे. अंकिता देखील अनेक खोट्या पसरवत असल्याचं तिनं म्हटलं आहे. सुशांतच्या घरात राहून तिनं कोणत्या घराचे कागदपत्रं दाखवले आहेत, असा टोला देखील रियानं अंकितावर लावले आहेत.तसंच माझ्यावर सुशांतच्या पैशांवर ताबा मिळवण्याचे आरोप केले जात आहेत, तसं असतं तर सुशांत अजूनही अंकिता राहात असेलल्या घराचे हफ्ते भरत होता, ते पहिल्यांदा थांबवले असते, असं रियानं म्हटलं आहे.अंकितानं सुशांतवर प्रेम केलं होतं, मी देखील त्याच्यावर प्रेम केलं, या परिस्थितीत तिनं माझं दु:ख समजून घ्यायला हवं होतं, असं देखील रियानं म्हटलं आहे. सीबीआयकडून समन्स सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरू असून, रिया चक्रवर्तीला सीबीआयनें समन्स बजावले आहेत. दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरणात त्याचीरिया चक्रवर्ती ही मुख्य आरोपी मानली जातेय. दुसरीकडं, रिया एका मुलाखतीत सुशांत आणि त्याच्या कुटुंबीयांमधील नात्यावर बोलली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयचे पथक सुशांत मृत्यू प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची चौकशी करत आहे. सुशांतनं आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली याचा तपास केला जात आहे. सीबीआयचं पथक सुशांतच्या घरीही गेले होते. तिथं त्यांनी 'क्राइम सीन रिक्रीएट'ही केला होता. दरम्यान, सुशांत प्रकरणात अंमली पदार्थांचा काही संबंध आहे, याची चौकशी एनसीबीकडून करण्यात येईल. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे संचालक राकेश अस्थाना यांनी ही माहिती दिलीय. 'आम्ही सुशांत प्रकरणाची चौकशीही सुरू करत आहोत', असं एनसीबीकडून सांगण्यात आलं आहे. सुशांतसिंह राजपूतकडं नोकरी करणार्‍या नीरज सिंगनं सुशांत हा गांधा ओढत असल्याचा दावा केला होता. नीरजनं मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबातून ही माहिती समोर आली आहे. मृत्यूच्या काही दिवस आधी त्यानं सुशांतसाठी गांजाची सिगारेट बनवून दिली होती. ज्या दिवशी सुशांतसिंहचा मृतदेह बेडरूममध्ये लटकलेला आढळला त्या दिवशी गांजा ठेवण्यात येणारा बॉक्स तपासला होता. तो बॉक्स रिकामा होता, असं नीरजनं पोलिसांना होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hNKT9q