मुंबई- सुशांतसिंग राजपूत प्रकरणात मनी लॉण्ड्रिंग संबंधी चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने () रिया चक्रवर्तीचे दोन्ही मोबाइल फोन आणि लॅपटॉप ताब्यात घेतले आहेत. तिच्या मोबाइलमधून आणि लॅपटॉपमधून महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते असं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. टाइम्स नाऊला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ११ ऑगस्ट रोजी प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने रियाचे दोन मोबाइल फोन ताब्यात घेतले. यासोबतच रियाचा लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणंही जप्त करण्यात आली आहेत. यावेळी ईडीने रियाचा भाऊ शौविक आणि वडील इंद्रजित चक्रवर्ती यांचे मोबाइलही जप्त केले आहेत. यापूर्वी, ईडीच्या चौकशी दरम्यान रियाने तिच्या दुसर्‍या फोन नंबरची माहिती दिली नव्हती. हे कळल्यानंतर ईडीने तिची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्याचा निर्णय घेतला. चौकशीत सहकार्य करत नाही रिया आणि तिचं कुटुंब आणि तिचे कुटुंबीय तासन् तासाच्या चौकशीनंतरही ईडीला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नसल्याचं म्हटलं जात आहे. ईडीने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरंही ते देत नाहीत. पहिल्या दिवसाच्या चौकशीत रिया आणखी एक मोबाइल फोन वापरत असल्याचं ईडीला कळलं. यानंतर रियाच्या भावाला घरी पाठवून दुसरा फोन मागवून आणण्यास सांगण्यात आला होता. रिया तिच्या उत्पन्नाची आणि खर्चाची माहिती देत नाही ईडी सतत रिया चक्रवर्तीला तिचे उत्पन्न, गुंतवणूक आणि खर्चाची माहिती विचारत आहे. प्रत्येक चौकशीत याच प्रश्नांवर भर दिला जात आहे. रियासोबतच सुशांत आणि रियाची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदीचीही विचारपूस केली जात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल सांगितले की, रियाच्या इनकम टॅक्स रिटर्नमध्ये तिची मिळकत आणि खर्च यांच्यात बरच अंतर आहे. याशिवाय रियाने तिच्या मालमत्तेबद्दलही कोणती समाधानकारक माहिती ईडीला दिली नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XLOmNN