मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यूचा तपास सीबीआय मार्फत केला जाणार असला तरी सुशांतच्या चाहत्यांनी त्याची गर्लफ्रेंड हिला दोषी ठरवलं आहे. सोशल मीडियावर देखील रियावर मोठ्या प्रमाणत टीका करण्यात येत आहे. रियाला गुन्हेगार आणि दोषी ठरवणं चुकीचं आहे, असं म्हणत अभिनेत्री हिनं रियाला पाठिंबा दिला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर तिला दोषी ठरवण्यात येत आहे. तसंच मीडियाद्वारे देखील गुन्हेगाराच्या रुपात प्रेक्षकांना दाखवण्यात येत असल्याचं म्हणत रियानं प्रसार माध्यमांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सर्व प्रकारानंतर स्वरानं रियाला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात स्वरानं एक ट्विट केलं आहे. रियासोबत एक विचित्र आणि भयानक पद्धतीचं मीडिया ट्रायल सुरू आहे, ज्याचं नेतृत्व एक विशिष्ठ वर्ग करतोय. मला आशा आहे की, सर्वाच्च न्यायालय या सर्व प्रकाराकडं गांभिर्यानं पाहिलं', असं रियानं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. रियाला पाठिंबा दिल्यानं सुशांतचे चाहते स्वरा भास्कर हिच्यावर प्रचंड भडकल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मृत्यू प्रकरणात केंद्राच्या अधिसूचनेनंतर केंद्रीय अन्वेषण विभागानं (Central Bureau of Investigation - CBI) तपास आपल्या हाती घेतला आहे. या प्रकरणात सीबीआयनं सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. सीबीआयनं सुशांतची कथित गर्लफ्रेंड , इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल केलीय. सीबीआयची टीम सध्या बिहार पोलिसांच्या संपर्कात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gSYzjm