Full Width(True/False)

त्या रात्री रिया, प्रियांका आणि सुशांतमध्ये नक्की काय घडलं

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करण्याची संपूर्ण जबाबदारी सीबीआयकडे सोपावली आहे. हा निर्णय येण्याच्या एक दिवसआधी रिया चक्रवर्तीने तिचं अजून एक स्टेटमेन्ट जारी केलं होतं. यात तिने अनेक गोष्टींचे खुलासे केले. सुशांतच्या वडिलांच्या वकिलांना विकास सिंह यांनी काही दिवसांपूर्वी माहिती देताना सांगितलं होतं की रियाने सुशांतच्या बहिणीवर विनयभंगाचा आळ घेतला होता. रियाचे वकील सतीन मानेशिंदे यांनी सुशांतची बहीण प्रियांकावर रिया चक्रवर्तीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आळ घातला आहे. मानेशिंदे यांच्या मते, प्रियांकाने नशेत रियाची छेड काढली आणि तिला चुकीच्या पद्धतीने हात लावण्याचा प्रयत्न केला. याचमुळे सुशांत आणि त्याच्या बहिणींमध्ये नंतर अंतर पडले. या घटनेचा तपशीलवार रिपोर्ट देताना रियाचे वकील म्हणाले की, नात्याच्या सुरुवातीच्या काळात रिया सुशांतच्या घरी गेली होती. तेव्हा आणि तिचा नवरा सिद्धार्थ सुशांतसोबत रहायचे. एप्रिल २०१९ च्या आसपास एका रात्री रिया आणि प्रियांका दोघंही एका पार्टीला गेले होते. पार्टीत प्रियांकाने जास्त दारू प्यायली. पार्टीतल्या पुरुषांसह तिथे उपस्थित महिलांसोबतही ती विचित्र वागत होती. रियाचे वकील पुढे म्हणाले की, 'यानंतर रियाने प्रियांकाला जबरदस्ती सुशांतच्या घरी आणलं. घरी आल्यावर सुशांत आणि प्रियांका परद दारू प्यायला बसले. पण रियाला दुसऱ्या दिवशी शूट असल्यामुळे ती झोपायला गेली. रिया झोपलेली असताना अचानक तिला बेडमध्ये सुशांतची बहीण प्रियांका दिसली. ती रियाला चुकीच्या पद्धतीने हात लावण्याचा प्रयत्न करत होती. रियाला हे पाहून धक्का बसला. तिने प्रियांकाला खोलीतून बाहेर जाण्यास सांगितलं. यानंतर रिया स्वतःचं घरी निघून गेली.' रियाने या सर्व गोष्टी सुशांतला सांगितल्या आणि याच गोष्टीवरून सुशांत आणि प्रियांकामध्ये वाद झाला. या घटनेनंतर रिया आणि सुशांतच्या कुटुंबियांत तणावपूर्वक संबंधच होते. सुशांतच्या निधनानंतरही कुटुंबियांनी रियाला अंत्यसंस्काराला येऊ दिलं नाही. २० जणांच्या यादीतून तिचं नाव वगळलं. तसेच रियाच्या वकिलांनी सुशांतचं कुटुंब जाणीवपूर्वक रियाला या सगळ्यात गुंतवत असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, ' रियावरचे सर्व आरोप निरर्थक आहेत. ४० दिवस बसून विचार करून हे आरोप लावण्यात आले आहेत. २७ जुलैपर्यंत मुंबई पोलीस किंवा इतर कुठेही सुशांतच्या कुटुंबियांकडून कोणतेही आरोप आले नाहीत. मुंबई पोलिसांनी त्यांचे जबाबही नोंदवून घेतले होते. सुशांतचं कुटुंब सुशिक्षित आहे आणि त्यांच्या घरात ओपी सिंहसारखे आयपीएस ऑफिसर आहेत. हे आरोप बिनबुडाचे असून रियाला लक्ष्य केलं जात आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3l1G7Ht