मुंबई: बॉलिवूड अभिनेता यानं करोनावर मात केली असून, ट्विट करत ही बातमी त्यानं चाहत्यांसोबत शेअर केली आहे. गेल्या काही दिवासांपासून त्याच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान तो चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हेल्थ अपडेट देत असतो. नुकताच त्याने पोस्ट करून तो करोना मुक्त झाल्याचं सांगितलं आहे. तब्बल २९ दिवसानंतर अभिषेकनं करोवर मात केले आहे. त्यानं ही पॉझिटिव्ह बातमी चाहत्यांसोबत शेअर केली असून लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज ि मिळणार आहे. या २९ दिवसांत त्याची काळजी घेणारे रुग्णालयातील कर्मचारी, नर्स आणि उपचार करणारे डॉक्टर्स यांचे त्यानं आभार मानले आहेत. ११ जुलैला अमिताभ आणि अभिषेक दोघंही करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. त्याचदिवशी तातडीनं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्या आणि आराध्यालाही करोनाची लागण झाली होती. सुरुवातीला ऐश्वर्या आणि आराध्याला घरीच क्वारन्टीन करण्यात आलं होतं. मात्र १७ जुलै रोजी ऐश्वर्याला ताप आल्यामुळं त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वी शेअर केली होती पोस्ट: अभिषेकनं दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत हॉस्पिटलमधल्या केअर बोर्डचा फोटो शेअर केला होता. ' रुग्णालायातील दिवस २६, डिस्चार्ज प्लॅन- नाही कम ऑन बच्चन तू हे करू शकतोस.', असं त्यानं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अमिताभ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी अभिषेकसाठी मनोबल वाढवण्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी एक कविता शेअर केली होती. "धनुष उठा, प्रहार कर, तू सबसे पहला वार कर, अग्नि सी धधक-धधक हिरन सी सजग सजग सिंह सी दहड़ कर, शंख सी पुकार कर, रुके न तू, थके न तू, झुके न तू, थमे न तू." दरम्यान काल राज्यात एकाच दिवशी १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानं राज्यातील आत्तापर्यंतची रुग्णसंख्या ३ लाख २७ हजारांपर्यंत पोहोचली असल्यानं थोडा दिलासा मिळाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ही समाधानकारक आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ६६.७६ % इतका आहे. राज्यात एकाचवेळी १० हजार ४८३ नवीन रुग्ण आढळल्यानं राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ९० हजार २६२ इतकी झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २५ हजार ६९ हजार ६४५ चाचण्यांपैकी ४ लाख ९० हजार २६२ (१९.०७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3a4zY8y