Full Width(True/False)

संजय दत्त लीलावतीत दाखल; करोना चाचणी अहवालाची प्रतीक्षा

मुंबई: बॉलीवूडमध्ये करोनाची दहशत पसरली असतानाच अभिनेता संजय दत्तला आज श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तातडीने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. संजय दत्तची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तूर्त चिंतेचे कोणतेही कारण नसून आता स्वॅब चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे. ( admitted to ) वाचा: संजय दत्तची ऑक्सिजन लेवल कमी-जास्त होत असल्याने तसेच श्वास घेण्यास काहीसा त्रास होत असल्याने त्याला आज सायंकाळी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला सध्या नॉन-कोविड आयसीयू वॉर्डात ठेवण्यात आले असून रुग्णालयात दाखल होताच त्याची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर संजय दत्तचा स्वॅब घेऊन तो चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, संजय दत्तच्या आणखी काही चाचण्या करण्यात येणार आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. नॉन-कोविड रुग्णावर ज्याप्रकारेच उपचार होतात त्याप्रमाणे संजय दत्तवर उपचार सुरू आहेत, असे लीलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. रविशंकर यांनी सांगितले. वाचा: बच्चन परिवार आजच झालं करोनामुक्त बॉलीवूडमध्ये करोनाने शिरकाव केल्यानंतर सर्वात मोठा हादरा ठरला तो म्हणजे बच्चन कुटुंबाला पडलेला करोनाचा विळखा. महानायक अमिताभ बच्चन, पुत्र अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन, नात आराध्या अशा चार जणांना करोनाची लागण झाल्याने सगळेच हादरले. बच्चन यांचे चारही बंगले खबरदारी म्हणून सील करण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांनी आयुष्यात अनेक संकटे झेलली. त्याच हिमतीने त्यांनी करोनाशीही दोन हात केले. त्या जोरावर अमिताभ करोनामुक्त होऊन घरी परतले. त्याआधी ऐश्वर्या व आराध्याही करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले. मुख्य म्हणजे तब्बल २८ दिवसांनंतर आजच अभिषेक बच्चनला नानावटी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. अभिषेकचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. या पार्श्वभूमीवर आता रुग्णालयात दाखल झाल्याने त्याचे चाहतेही चिंतेत पडले आहेत. संजय दत्तची प्रकृती स्थिर असून स्वॅब चाचणीच्या अहवालानंतरच त्याच्यावरील पुढील उपचारांची दिशा ठरणार आहे. वाचा:


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Dyip4R