Full Width(True/False)

स्वातंत्र्य दिनः विवोच्या फोन्सवर जबरदस्त ऑफर्स

नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपन्यांनी आपली विक्री वाढवण्यासाठी फोनवर डिस्काउंट आणि ऑफर्स देण्यास सुरूवात केली आहे. देशात उद्या ७४ वे साजरा केला जाणार आहे. या दिनानिमित्त टेक कंपनी विवोने आपल्या फोनवर जबरदस्त डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने नुकताच लाँच केलेल्या स्मार्टफोनवर ही ऑफर्सची घोषणा केली आहे. यात Vivo X50 सीरीज, Vivo V19 आणि Vivo Y50 या स्मार्टफोनचा समावेश आहे. ही १६ ऑगस्ट रोजी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर आणि ऑफलाइन स्टोर्सवर ग्राहकांना मिळणार आहे. वाचाः इंडिपेंडेंस डे ऑफर्स (Independence Day Sale) सोबत विवो आपल्या ग्राहकांना फोन खरेदीवर ईएमआय ऑप्शन सुद्धा देत आहे. ९९९ रुपयांच्या ईएमआयवर फोन खरेदी करता येवू शकतो. फोन खरेदीवर कंपनी ऑफर देत आहे. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक ग्राहकांना नवीन गिंबल कॅमेऱ्याचा Vivo X50 सीरीज स्मार्टफोन खरेदीवर ४ हजारांपर्यंत कॅशबॅक देणार आहे. या सीरीज अंतर्गत वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर केवळ १९९० रुपयात देत आहे. वाचाः स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर Vivo V19 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ९९९ रुपयांत स्क्रीन रिप्लेसमेंटची ऑफर या सेलमध्ये मिळणार आहे. विवो कस्टमर्सला १२ महिन्यांची एक्सटेंडेड वॉरंटी मिळत आहे. तसेच हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वोडाफोन - आयडिया युजर्संना ८१९ रुपयांच्या प्लान रिचार्जवर रोज २ जीबी डेटा एक्स्ट्रा मिळणार आहे. Vivo X50 सीरीज मध्ये Vivo X50 Pro आणि Vivo X50 स्मार्टफोनचा समावेश आहे. वाचाः Vivo V19 स्वस्त या सेलमध्ये ग्राहक या फोनला २४ हजार ९९० रुपयांत खरेदी करू शकतो. तसेच ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा Vivo Y50 हा स्मार्टफोन १७ हजार ९९० रुपयात खरेदी केला जावू शकतो. तसेच कंपनीने नुकताच लाँच केलेला V19 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. ४ हजार रुपयांची कपात मिळाल्यानंतर ४ जीबी रॅमचा फोन २४ हजार ९९९ रुपयांना तर ८ जीबी रॅम फोन २७ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31R2gzt