Full Width(True/False)

सुशांतच्या मृत्यूला दोन महिने उलटून गेल्यानंतरही 'हे' दहा प्रश्न अनुत्तरीतच

मुंबई: दोन महिन्यापूर्वी म्हणजेच १४ जून रोजी बॉलिवूड अभिनेता याचा मृत्यू झाला. दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरी देशात इतकंच नाही तर परदेशातही त्याच्या मृत्यूची चर्चा होताना दिसतेय.१४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानं आत्महत्या केली असं पोलिसांनी सांगितलं होतं. परंतु त्या दिवसापासून आजपर्यंत या प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्या, सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या, असं असलं तरी सुशांतचा मृत्यून नेमका कसा झाला याचं कोडं आजही उलगडू शकलं नाही. सुशांत मृत्यू प्रकरणात केंद्राच्या अधिसूचनेनंतर केंद्रीय अन्वेषण विभागानं (Central Bureau of Investigation - CBI) तपास आपल्या हाती घेतला आहे. या प्रकरणात सीबीआयनं सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पण आजही महत्त्वाचे दहा प्रश्न अनुत्तरीतच आहेत. १. सुशांतचे चाहते आणि त्याचं कुटुंब सीबीआय चौकशीची मागणी करत असले तर, त्यात नेमकी अडचण काय आहे? २.सुशांतच्या मृत्यू प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची नक्की काय भूमिका आहे? विनाकारण तिला यात ओढलं जातंय? ३.सुशांतच्या घरात त्याच्यासोबत राहूनही त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याला अनेक प्रश्नांची उत्तर का देता येत नाहीएत? ४.दोन महिन्यानंतरही सुशांतच्या मृत्यूप्रकरणात मुंबई पोलिसांनी अद्यापही FIR का दाखल केली नाही? ५.सुशांतच्या बॅंक अकाऊंटमध्ये नेमकी किती रक्कम होती? १५ कोटी होते तर त्याचे पुरावे आहेत का? ६.या प्रकरणाचा तपास करताना रियाच्या कॉल रेकॉर्ड डिटेल्सची माहिती ईडीकडून काढण्यात आली...मुंबई पोलिसांनी यापूर्वी तिचे कॉल रेकॉर्ड का तपासले नाहीत? ७.एक्स मॅनेजर दिशा सालियान हिची आत्महत्या आणि सुशांतचा मृत्यू यांचा खरंच काही संबंध आहे का? ८.आगामी बिहार निवणूकीसाठी सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा वापर राजकीय पक्षांकडून केला जातोय का? ९.सुशांतनं डिप्रेशनमुळं आत्महत्या केली असेलही , पण तो डिप्रेशममध्ये जाण्याचं नेमकं कारण काय? बॉलिवूडमधली घराणेशाही की त्याचं खासगी आयुष्य? १०.शेवटचा प्रश्न...सुशांतनं आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली?


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iGjKWi