नवी दिल्लीः चायनीज टेक कंपनी रियलमी सी सीरीज बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोन खूप पसंत केला जात आहे. या सीरीजमध्ये नुकतेच अनेक फोनचा समावेश करण्यात आला आहे. नवीन डिव्हाइसेज मधील ला खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. आज दुपारी १२ वाजता फ्लॅश सेल आयोजित करण्यात आला आहे. फक्त ७ हजार ४९९ रुपये किंमतीच्या या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स आणि परफॉर्मन्स आहेत. तुम्हाला स्वस्तात मस्त फोन हवा असेल तर आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवरून हा फोन खरेदी करू शकता. वाचाः किंमत आणि ऑफर्स कंपनीने Realme C11 ला केवळ एका व्हेरियंटमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत लाँच केले आहे. याची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. याला दोन रंगात रिच ग्रीन आणि रिच ग्रेमध्ये खरेदी करता येवू शकते. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ टक्के डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळणार आहे. वाचाः Realme C11 चे वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये कंपनीने ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720x1600 पिक्सल्स मिळतो. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर दिला आहे. २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोन असला तरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने युजर्स आणखी स्टोरेज वाढवता येवू शकतो. वाचाः फोनच्या रियर पॅनलवर ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी लेन्स कॅमेरा दिला आहे. तसेच सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात चार्जिंग सपोर्टसह दमदार 5000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32oj6pH