Full Width(True/False)

CBI येणार कळतात बीएमसीने पुढे केला 'क्वारन्टीन नियम'

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय सुनावला. या प्रकरणाची पूर्ण चौकशी आता सीबीआयकडे देण्यात आली आहे. मात्र, या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांमध्ये गोंधळ उडाला आहे. दरम्यान, बीएमसीने या केस प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बीएमसीने स्पष्ट केलं की, जर सात दिवसांपेक्षा कमी काळ मुंबईत राहण्याचा विचार करत असेल तर त्यांना क्वारन्टीन करण्यात येणार नाही. पण, जर त्यांना सात दिवसांपेक्षा जास्त काळ रहायचे असेल तर त्यांना तसी परवानगी घ्यावी लागेल. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने सुशांतच्या केसवर निर्णय दिल्यानंतर देशात आनंद साजरा होत असताना महापालिकेने हा निर्णय घेतला. दोन पोलीस अधिकाऱ्यांचीही केली जाऊ शकते चौकशी या प्रकरणात सीबीआय मुंबईच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी प्रकरणातील मुख्य संशयिताच्या सतत संपर्कात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या अधिकाऱ्यांनीन सुशांतच्या मेव्हण्यांनी केलेली तक्रार गांभीर्याने घेतलं नसल्याचंही दिसतं. बिहार पोलिसांतील एका अधिकाऱ्याला केलं होतं क्वारन्टीन सुशांतचे वडील केके सिंह यांनी पटनामध्ये रिया चक्रवर्तीविरूद्ध एफआयआर दाखल केली होती. यानंतर बिहार पोलिसांची एक टीम या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आली होती. मात्र यावेळी मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना सहकार्य न केल्याचं म्हटलं गेलं. यानंतर बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत पाठवण्यात आले होते. मात्र विनय मुंबईत येताच त्यांना क्वारन्टीन करण्यात आलं. तिवारी यांना क्वारन्टीनमध्ये ठेवू नये यासाठी बिहार सरकारने पत्रकही पाठवलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31dNKTj