नवी दिल्लीः यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. टायरेक्ट टू द होम सर्विस प्रोव्हाईडर आपल्या यूजर्ससाठी चार दिवसांपर्यंत फ्री सर्विस ऑफर करीत आहे. D2h ला स्वस्त प्लान ऑफर करणारे ऑपरेटर म्हणून पाहिले जाते. कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये १ महिन्यापासून ते १२ महिन्यांपर्यंत वैधतेचे प्लान आहेत. कंपनी लाँग टर्म प्लान ने रिचार्ज करणाऱ्या युजर्सला आधी प्रमाणे फ्री सर्विस ऑफर करीत आहे. परंतु, यावेळी दोन महिन्यांच्या रिचार्जवर फ्री सर्विस दिली जात आहे. वाचाः एकत्र करावा लागेल दोन महिन्यांचा रिचार्ज ज्या D2h यूजर्सला चार दिवसांची फ्री सर्विस हवी असेल त्यांनी कमीत कमी दोन महिन्यांचे सब्सक्रिप्शन एकत्र घ्यावे लागेल. या ऑफर अंतर्गत कंपनी दोन महिन्यांच्या रिचार्जवर डिस्काउंट न देता चार दिवस फ्री टीव्ही पाहण्याची संधी देत आहे. युजरला आपल्या डीटूएच कनेक्शनला कंपनीच्या वेबसाइट किंवा अॅप D2h Infinity वरून रिजार्ज करू शकते. यात कोणत्याही रिचार्जवर युजर्संना फ्री व्हाऊचर मिळणार आहे. वाचाः या प्लानमध्ये एका महिन्यांपर्यंत फ्री सर्विस कंपनी आपल्या युजर्सला फ्री सर्विस अंतर्गत काही बेस्ट ऑफर करीत आहे. यात तीन महिन्यांच्या रिचार्जवर युजर्संना ७ दिवसांपर्यंत फ्री सर्विस देत आहे. तर ६ महिन्यांच्या रिचार्जवर १५ दिवसांची फ्री सर्विस देत आहे. जर डीटूएच च्या एका वर्षाच्या लाँग टर्म प्लानवर एका महिन्याचे सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे. वाचाः कंपनी आपल्या युजर्सला सेट टॉप बॉक्सचे पाच पर्याय देत आहे. D2h चा पहिला डिजिटल सेट बॉक्स १४९९ रुपयांचा आहे. याचे एचडी व्हेरियंट साठी युजर्सला १५९९ रुपये मोजावे लागतील. D2h च्या HD RF सेट-टॉप बॉक्सची किंमत १७९९ रुपये आहे. या बॉक्सला Magicstick सोबत २१९८ रुपयात खरेदी करता येवू शकते. कंपनी युजर्संना अँड्रॉयड सेट टॉप बॉक्स सुद्धा देत आहे. याची किंमत २४९९ रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PGrISC