कराची- पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारने शनिवारी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. या अधिकाऱ्यांनी खानच्या सिनेमातील अभिनेत्री हिला लाहौरमधील एका ऐतिहासिक मशिदीत डान्स करण्याची परवानगी दिली होती. फक्त डान्सच नाही तर सबाने डान्स करतानाचा व्हिडिओही काढला. सबा विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या व्हिडिओक सबासोबत अभिनेता बिलाल सैयदलाही मशिदीचं पावित्र भंग केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. पंजाब सरकारचे मंत्री सईद हसन शाह म्हणाले की, 'वजीर खान मशिदीत व्हिडिओ करण्यास परवानगी देणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना आम्ही निलंबीत केलं आहे. तसेच त्यांच्याविरोधात चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. जे दोषी आहेत त्यांना शिक्षा नक्की होणार.' या घटनेनंतर अभिनेत्री सबाला सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तसेच तिने या घटनेवर माफी मागावी अशीही मागणी केली जात आहे. सबा कमरने याबद्दल ट्वीट करत स्पष्ट केलं की, 'हा एक पडद्या मागचा व्हिडिओ होता. निकाहनंतर एका जोडप्याचा आनंदी चेहरा दाखवण्यासाठी शूट केलं जात होतं. पण तरीही आम्ही कोणाचं मन दुखावलं असेल तर आम्ही मनापासून माफी मागतो.' सबा कमरने बॉलिवूड सिनेमा हिंदी मीडियममध्ये काम केलं होतं. यात तिने इरफानच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय पाकिस्तानातील सोशल मीडिया सेन्सेशन कंदील बलोचच्या बायोपिकमध्येही तिने काम केलं आहे. २०१६ मध्ये भावानेच ऑनर किलिंग केले होते. सध्या पाकिस्तानातील अनेक राजकीय पार्ट्या सबाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2F8FMCy