नवी दिल्लीः रिलायन्स जिओकडे अनेक कॅटेगरीत प्रत्येक गरजेप्रमाणे ग्राहकांसाठी प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओकडे २ जीबी , ३ जीबी, १.५ जीबी, १ जीबी डेटा दररोजचे प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. कंपनीकडे २ जीबी डेटा दररोज मिळणारे दोन प्लान आहेत. जे वर्षभर वैधता देतात. म्हणजेच दररोज रिचार्ज करण्याची समस्या संपणार. तसेच या प्लानमध्ये जबरदस्त डेटा सुद्धा मिळणार आहे. जाणून घ्या दोन प्लानविषयी. वाचाः जिओचा २५९९ रुपयांचा प्लान जिओचा २५९९ रुपयांचा प्लानची वैधता ३६५ दिवसांची म्हणजेच एका वर्षाची आहे. या रिचार्ज प्लानमध्ये २ जीबी डेटा मिळतो. तसेच कंपनी १० जीबी डेटा अतिरिक्त देते. म्हणजेच एकूण या प्लानमध्ये ७४० जीबी डेटा युजर्संना मिळतो. दररोज मिळणाऱ्या डेटाची लिमिट संपल्यानंतर याची स्पीड कमी होऊन ती 64Kbps होते. ग्राहकांना जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर अन्य नेटवर्कवर १२ हजार कॉलिंग मिनिट्स मिळतात. वाचाः रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये १०० एसएमएस दररोज फ्री मिळतात. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन या पॅकमध्ये ऑफर केले जाते. जिओचा हा पॅक ३९९ रुपये किंमतीच्या डिज्नी प्लस हॉटस्टार सोबत येतो. वाचाः जिओचा २३९९ रुपयांचा रिचार्ज प्लान जिओच्या या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. २३९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. एकूण या प्लानमध्ये ७३० जीबी डेटाचा फायदा मिळतो. दररोज मिळणाऱ्या डेटाची लिमिट संपल्यानंतर त्याची स्पीड कमी होऊन 64Kbps होते. या प्लानमध्ये जिओ ते जिओवर अनलिमिटेड आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग साठी १२ हजार कॉलिंग मिनिट्स मिळतात. रिलायन्स जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन युजर्संना मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2DDyUfN