Full Width(True/False)

फेसबुक लाइव्हनंतर अभिनेत्रीची आत्महत्या; चार दिवसांनंतर उघडकीस आली घटना

मुंबईः अभिनेत्री सुशांतसिंह राजपूत आणि यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच आणखी एका अभिनेत्रीनं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. असं या अभिनेत्रीचं नाव असून तिनं टी.व्ही मालिका व भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. () अनुपमा पाठकनं रविवारी तिच्या दहिसर येथील राहत्या घरी गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी तिनं फेसबुक लाइव्हही केलं होतं. फेसबुक लाइव्हमध्ये तिनं तिच्या अडचणी चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या.तसंच, काही दिवसांनतर अनुपमानं सुशांतसिंह राजपुत यांच्या आत्महत्येप्रकरणी आवाज उठवला होता. वाचाः अनुपमानं गळफास घेण्यापूर्वी सुसाईड नोट लिहली होती. यात तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याची कारण लिहली आहे. मित्रानं दिलेल्या सल्ल्यानुसार मी एका कंपनीत १० हजारांची गुंतवणुक केली होते. कंपनी माझे पैसे व्याजासकट मागील वर्षी डिसेंबरमध्ये देणार होती. मात्र, आता ती कंपनी माझे पैसे परत देण्यास टाळाटाळ करत आहेत. असं तिनं सुसाइड नोटमध्ये लिहलं आहे. तर, एका व्यक्तीनं लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर माझी दुचाकी गाडी घेतली होती. तेव्हा मी माझ्या मुळ गावी होती. जेव्हा मी परत आले तेव्हा त्यानं माझी दुचाकी देण्यास नकार दिला, असं दुसरं कारण तिनं सुसाइट नोटमध्ये लिहलं आहे. वाचाः अनुपमाच्या घरात मिळालेल्या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत असून, यातील दोषींवर ठोस पुरावे मिळाल्यानंतर कारवाई केली जाईल, असं काशीमिरी पोलिस स्थानकाचे पोलीस अधिकारी संजय हजारे यांनी सांगितलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ieZDy1