Full Width(True/False)

जबरदस्त फीचर्सचा Realme C11 चा आज सेल, या ऑफर्स मिळणार

नवी दिल्लीः रियलमीचा स्वस्त स्मार्टफोन चा आज सेल आयोजित करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात या फोनला बजेट फ्रेंडली स्मार्टफोनला ७ हजार ५०० रुपयांत लाँच केले होते. आज दुपारी १२ वाजता ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्ट आणि कंपनीची अधिकृत वेबसाईट Realme.com वरून या फोनला खरेदी करता येवू शकेल. या स्मार्टफोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट यासारखे फीचर्स मिळणार आहेत. फोनची किंमत आणि ऑफर्स हा स्मार्टफोन एकाच व्हेरियंटमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज मध्ये येतो. रियलमी सी ११ ची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. हा फोन दोन कलरमध्ये रिज ग्रीन आणि रिच ग्रे मध्ये येतो फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के, अॅक्सिस बँक बज कार्डवर १० टक्के कॅशबॅक मिळत आहे. तर रियलमी डॉट कॉम ५०० रुपयांपर्यंत Mobikwik कॅशबॅक देत आहे. फोनचे खास वैशिष्ट्ये फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 720x1,600 पिक्सल आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज आणि मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर दिला आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. फोटोग्राफीसाठी यात ड्यूल रियर कॅमेरा दिला आहे. रियरमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच सोबत ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5,000mAh ची बॅटरी दिली आहे.


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ftzwSq