Full Width(True/False)

मृत्यूचा तिढा सुटणार, बिहार सरकारने पाठवला सर्वोत्तम डीआयजी

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येची केस अनेक दिवसांपासून लाइमलाइटमध्ये आहे. अनेकजण मुंबई पोलिसांच्या तपासाशी संतृष्ट नाहीयेत आणि सतत सीबीआयची मागणी करत आहेत. आता बिहार सरकारनेही अधिकृतरित्या केंद्र सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आता केंद्र सरकार सीबीआय चौकशीला परवानगी देतं की नाही हे पूर्णणे त्यांच्यावर अवलंबून आहे. दरम्यान, बिहार पोलिसांनी या केससाठी आता कंबर कसली आहे. यासाठी त्यांनी सर्वोत्तम अधिकाऱ्यांना ही केस देण्याची तयारीही दर्शवली आहे. किंवा विकास वैभव यांच्या नावाची चर्चा वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सुशांतसिंह राजपूतच्या केसची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांनी डीआयजी पातळीवरील सर्वोत्तम अधिकारी मुंबईला पाठवण्याची तयारी करत आहेत. या यादीत काही आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यात मुंगेरचे डीआयची मनू महाराज आणि एटीएसचे डीआयची विकास वैभव यांच्या नावाची चर्चा आहे. कामांमुळे राष्ट्रीय पातळीवर या दोन्ही आयपीएस अधिकाऱ्यांची ओळख आहे. मनू महाराज याआधी पटणाचे एसएसपी राहिले होते आणि तिथे त्यांनी सर्वोत्तम काम केलं होतं. डीजीपीने केला मुंबई पोलिसांवर हल्ला दरम्यान, बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, सुशांतसिंह राजपूतची केस सोडवण्यात सक्षम आहेत. जर जनतेला मुंबई पोलिसांवर विश्वास नाही तर त्यांचा हा भ्रम दूर करणंही त्यांच्याच हातात आहे. पण सध्या महाराष्ट्राचे अधिकारी चौकशीत मदत करणं तर दूर पण साधा फोनही उचलत नाहीत. बिहार पोलिसांसोबत त्यांचा व्यवहार चुकीचा याशिवाय बिहारच्या डीजीपींनी स्पष्ट केलं की, मुंबई पोलीस बिहार पोलिसांना चौकशी करू देत नाही. एवढंच नाही तर मुंबई पोलीस बिहार पोलिसांसोबत परक्या प्रमाणे व्यवहार करत आहेत. या सगळ्या वादात बिहार सरकारचा त्यांचे सर्वोत्तम अधिकारी या केसला लावण्याचा किती फायदा होतो हे तर वेळ आल्यावरच कळेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iaw4xK