मुंबई- काही दिवसांपूर्वी संजय दत्तची तब्येत खालावल्याची बातमी आली होती. त्याला श्वसनाचा त्रास असल्याचं म्हटलं गेलं होतं. सुरुवातीला त्याची करोना चाचणी केली असता ती निगेटीव्ह आली. यानंतर आणखीन काही चाचण्या केल्या असता त्याला असल्याचं समोर आलं. यानंतर संजय पुढील उपचारांसाठी परदेशात जाणार असल्याचंही म्हटलं जात होतं. पण आता तो मुंबईतच पुढील उपचार घेणार असल्याची बातमी येत आहे. फुफ्फुसांमध्ये जमा होतंय पाणी संजय दत्तला चौथ्या स्टेजजा फुफ्फुसांचा कर्करोग आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. यातच उपचारांना अजून उशीर केल्यासं मोठं नुकसान होऊ शकतं असंही सांगण्यात येत आहे. याचमुळे तातडीने उपचार घेण्यासाठी संजय वारंवार इस्पितळात जात आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, याआधी संजयच्या फुफ्फुसांतून १.५ लीटर पाणी काढण्यात आलं आहे. याचमुळे संजयची नाजूक प्रकृती पाहता त्याचे पुढील उपचार मुंबईतील कोकिलाबेन इस्पितळातच सुरू करण्यात येईल असं म्हटलं जात आहे. मान्यता दत्तनेही दिले होते संजयचे हेल्थ अपडेट दरम्यान, संजयची पत्नी मान्यता दत्तनेही सोशल मीडियावर संजयच्या आरोग्याची माहिती दिली होती. मान्यताने लिहिले की, 'जे कोणी आम्हाला विचारत आहे, त्यांना मी सांगू इच्छिते की संजू मुंबईतच प्राथमिक उपचार पूर्ण करेल. कोविडची परिस्थिती सुधारली की आम्ही पुढील उपचारांची योजना आखू. सध्या संजू कोकिलाबेन इस्पितळात अत्यंत आदरणीय डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. मी सर्वांना हात जोडून विनंती करते की, संजूच्या आजारपणाच्या स्टेजचा स्वतःहून अंदाज लावू नका, डॉक्टरांना त्यांचं काम करू द्या. संजूच्या आरोग्याविषयी आम्ही तुम्हाला नियमित सांगत राहू.’
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hKWkPw