Full Width(True/False)

सॅमसंगची जबरदस्त ऑफर, TV आणि फ्रिज खरेदीवर महागडे स्मार्टफोन फ्री

नवी दिल्लीः सॅमसंगचे प्रोडक्ट खरेदी करण्याची ही जबरदस्त संधी आहे. कंपनीने युजर्संसाठी एक खास इंडिपेंडेंस डे ऑफर आणली आहे. यात टेलिव्हिजनसोबत रेफ्रिजरेटर, स्मार्ट अवन, वॉशिंग मशीन आणि एयर कंडिशनर्सला जबरदस्त डिलमध्ये खरेदी करता येवू शकते. या ऑफर मध्ये सॅमसंगचाय QLED टीव्ही खरेदी केल्यानंतर ७७ हजार ९९९ रुपयांचा Galaxy S20+ स्मार्टफोन फ्रीमध्ये मिळणार आहे. हा सेल १ ऑगस्टपासून सुरू करण्यात आला आहे. वाचाः जबरदस्त स्कीमचा उठवा फायदा ३१ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये १५ टक्के कॅशबॅकची जबरदस्त ऑफर आहे. या सेलमध्ये ९९० रुपयांच्या ईएमआय खरेदीवर अनेक प्रोडक्ट खरेदी करता येवू शकतात. ऑफरमध्ये सॅमसंग QLED TV, 4K UHD TV, Smart TV, SpaceMax Family Hub रेफ्रिजरेटर, Sie-By-Side आणि फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर, फ्लेक्सवॉश वॉशिंग मशीन, ऐडवॉश वॉशिंग मशीन सह अन्य प्रोडक्ट निश्चित बेनिफिटवर ऑफर केले जात आहेत. वाचाः QLED 8K TV वर महागडा फोन फ्री या ऑफरमध्ये कंपनी आपल्या QLED 8K TV खरेदीवर ७७ हजार ९९९ रुपयांचा सॅमसंग गॅलेक्सी एस२० प्लस स्मार्टफोन फ्री ऑफर करीत आहे. तसेच या सेलमध्ये खरेदी केलेल्या टीव्हीवर १० वर्षाची नो स्क्रीन बर्न - इन वॉरंट शिवाय QLED TV च्या पॅनल्सवर ३ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. स्मार्ट टीव्हीवर ९ हजारांचा कॅशबॅक सॅमसंगच्या स्मार्ट टीव्ही खरेदीवर युजर्संना ९ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. तसेच ४३ इंचाचा आणि त्यापेक्षा जास्त स्क्रीन साईज असलेल्या मॉडल्सला ९९० रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येवू शकते. वाचाः फ्रीज खरेदीवर ३८ हजारांचा फोन फ्री सॅमसंगचा फ्रीज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जबरदस्त ऑफर मिळत आहे. कंपनीने स्पेसमॅक्स फॅमिली हब रेफ्रिजरेटर खरेदीवर युजर्संना ३७ हजार ९९९ रुपये किंमत असलेला सॅमसंग गॅलेक्सी नोट १० लाइट स्मार्टफोन मिळत आहे. ३०० लीटरपेक्षा जास्त फ्रीज आणि वॉशिंग मशीन खरेदीवर १५ टक्के कॅशबॅक कंपनी देत आहे. या वस्तूंला सुद्धा ९९० रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येवू शकते. सॅमसंगची खास ईएमआय स्कीम युजर्संना महागडे प्रोडक्ट खरेदी करणे सोपे जावे यासाठी कंपनीने My Samsung My EMI ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत आपली पसंतीची प्रोडक्ट कमीत कमी डाऊन पेमेंट आणि ईएमआयवर खरेदी करता येवू शकते. या ईएमआयची जास्तीत जास्त मर्यादा ३६ महिन्यांची आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PohXbz