Full Width(True/False)

सॅम्युअलने रियाला विचारलं Weed साठी १७ हजार रुपये देणार का?

मुंबई- बॉलिवूड अभिनेता यांच्या मृत्यूच्या प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. आता आणि यांच्यातले व्हॉट्सअप चॅट समोर आले आहेत. टाइम्स नाऊकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिया आणि सॅम्युअल यांच्यात एका डिलबद्दल बोलणं झालं होतं. यावेळी मिरांडाने रियाला विचारलं की, 'तुम्ही दिपेशला दोन बॅगेसाठी १७ हजार रुपये देऊ शकते का? एक बॅग आमच्यासाठी आणि दुसरी त्याच्यासाठी. तो आमच्याकडे त्या बॅग देईल.' यावर हो, आम्ही देऊ शकतो असं उत्तर रियाने दिलं. या दोघांमध्ये १ मे २०२० रोजा हे चॅट झालं होतं. रियाने मिरांडाकडे मागितली मदत यानंतर, ११ मे २०२० रोजी रियाने मिरांडाला मेसेज केला आणि म्हणाली, 'गुड मॉर्निंग सॅम, तुझी मदत हवीये. ट्रेनरसह पाळीव कुत्रा हवा आहे आणि वायफाय अद्याप सुरू झालेलं नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फोन कर. धन्यवाद.' कंगनाने उपस्थित केले प्रश्न आता एनसीबी या प्रकरणाची बारकाईने चौकशी करीत आहे. ड्रग अँगल समोर आल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांनी अद्याप याचा तपास का केला नाही, असा सवाल तिने यावेळी केला. ती पुढे म्हणाली की, जर अशाच प्रकारे चौकशी सुरू राहिली तर अनेक बड्या लोकांची नावं समोर येतील. जयाने रियाला पाठवला होता निरोप यापूर्वी मंगळवारी स्पष्ट झालं की जय सहाने रिया चक्रवर्तीला ‘त्याला चहा, कॉफी किंवा पाण्यातून चार थेंब टाकून दे आणि ३० ते ४० मिनिटांनंतर त्याचा परिणाम पाहा असा मेसेज केला होता.’


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gzRNOr