नवी दिल्लीः पोकोने आपला नवीन मिड रेंज स्मार्टफोन लाँच केला आहे. पोकाची प्रसिद्ध एक्स सीरीजचा हा नवीन फोन स्लीम बेजल, चार रियर कॅमेरे आणि ऑक्टा - कोर प्रोसेसर यासारखे जबरदस्त फीचर सोबत येतो. फोन दोन रॅम आणि स्टोरेजसोबत लाँच केला आहे. या फोनला या वर्षी फेब्रुवारी मध्ये लाँच केलेला चे अपग्रेड व्हर्जन व्हेरियंट आहे. कंपनीने या फोनला एका व्हर्च्यूअल इव्हेंटमध्ये लाँच केले आहे. या फोनची सुरुवातीची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. वाचाः Poco X3 NFC चे वैशिष्ट्ये फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले HDR 10 सपोर्ट, DybamicSwitch फीचर आणि 240Hz सँपलिंग रेटसोबत येतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये कॉर्निंग गोरीला ग्लास ५ दिला आहे. ड्यूल नॅनो सीम सपोर्ट करणारा हा फोन अँड्रॉयड १० बेस्ड MIUI 12 वर काम करतो. ६ जीबी रॅम सोबत येणाऱ्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 732G SoC प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात सोनी IMX682 सेंसर सोबत ६४ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. कॅमेऱ्यात पंचहोल आहे. वाचाः वाचाः १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,160 mAh बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. IP53 रेटिंग आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर सोबत या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, NFC आणि IR Blaster सह कनेक्टिविटीसाठी अन्य स्टँडर्ड ऑप्शन दिले आहेत. वाचाः वाचाः फोनची किंमत पोको X3 NFC ला सध्या युरोपमध्ये लाँच केले आहे. याच्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत २२९ यूरो (जवळपास १९ हजार ९०० रुपये) आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत २६९ यूरो (जवळपास २३ हजार ४०० रुपये) आहे. कोबाल्ट ब्लू आणि शॅडो ग्रे कलर ऑप्शनमध्ये येणाऱ्या या फोनला लवकरच भारतात लाँच केले जावू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35eYG5D