मुंबई- तेलगू सिनेसृष्टीतील नावाजलेलंनाव यांचं आंध्रप्रदेश येथील गुंटूर जिल्ह्यात मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. विनोदी कलाकार आणि चरित्र अभिनेते म्हणून त्यांची ख्याती होती. तेलगू देशम पार्टीचे प्रमुख एन यांनीही जयप्रकाश यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री नायडू यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, 'जयप्रकाश रेड्डी गुरू यांच्या निधनामुळे आणि थिएटरने त्यांचा एक हिरो गमावला आहे. अनेक दशकं त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांनी अनेक आठवणी दिल्या आहेत. या दुःखद काळात त्यांच्या मित्र- परिवाराला हिंम्मत मिळो.' जयप्रकाश रेड्डी यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 'ब्रह्मपुत्रुडु' ने केली होती. याशिवाय प्रेमिचुकुंदम रा, गब्बर सिंह, चेन्नाकेशवारेड्डी, सीथाया आणि टेंपर यांसारख्या अनेक प्रसिद्ध सिनेमांत त्यांनी काम केलं. जयप्रकाश रेड्डी अल्लागड्डा जिल्ह्यात राहणारे होते आणि आपल्या रायलसीमावाल्या खास शैलीत बोलण्यासाठी विशेष प्रसिद्ध होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2FbYxVN