मुंबई :सोशल मीडियावर बुधवारी हॅशटॅग, हा ट्रेंड खूप जोरात सुरू होता. त्यामुळे विकी कौशिक कोण आहे? याची चर्चा सुरू झाली. अभिनेत्री कंगना रनौटनं एक ट्विट केल्यानंतर हा ट्रेंड वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. बुधवारी कंगनानं तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ट्विटरवर एक पोस्ट लिहिली. यात, काही बॉलिवूड कलाकारांची अमली पदार्थ चाचणी केली पाहिजे, अशी मागणी तिनं केली होती. विशेष म्हणजे हे ट्विट तिनं पीएमओ इंडियाला टॅग केलं होतं. कंगनानं लिहिलेलं ट्विट असं होतं की, 'रणवीर सिंग, अयान मुखर्जी, विकी कौशिक यांना मी ड्रगची चाचणी करण्यासाठी त्यांचे रक्ताचे नमुने देण्याची विनंती करते. त्यांना कोकेनचं व्यसन असल्याची अफवा आहे. त्यांनी ही अफवा खोडून काढावी असं मला वाटतं. त्यांची चाचणी नकारार्थी असल्यास लाखो लोकांना हे तरुण प्रेरणादायी ठरु शकतात.' यामध्ये कंगनानं लिहीलेलं विकी कौशिक हे नाव पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. तिला कदाचित विकी कौशल असं म्हणायचं असेल. परंतु, यामुळे विकीच्या चाहत्यांसह अनेकांनी कंगनालाच उलटे खडे बोल सुनावले. तिच्या या ट्विटवर हजारो प्रतिक्रिया येताहेत आणि यावरील चर्चा वाढत चालली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gTaH2U