Full Width(True/False)

कंगनाचा रेणुका शहाणेंवर पलटवार, 'तुम्हीही लचके तोडायला आलात'

मुंबई- आपल्यी निर्भीड वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियापासून स्वत:ला नेहमीच दूर ठेवणाऱ्या कंगनाला सुशांतसिंह राजपूतच्या चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेरणेतून कंगनाने ट्विटरवर एन्ट्री घेतली. आता कंगना स्वतः तिच्या चाहत्यांशी थेट संवाद साधते. अनेकदा ती बॉलिवूड आणि राजकीय गोष्टींवर उघडपणे भाष्य करताना दिसते. अलीकडेच कंगनाने ट्वीट करून म्हटलं होतं की, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघडपणे धमकी दिली आहे. मुंबई आता पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटते? यानंतर यांनीही कंगनाच्या ट्वीटला प्रत्युत्तर दिलं होतं. आता रेणुका यांच्या ट्वीटला पुन्हा कंगनाने उत्तर दिलं आहे. कंगना रणौत बॉलिवूडमधील घराणेशाही, इंडस्ट्रीतील अमली पदार्थांचं व्यसन या सर्वांबद्दल उघडपणे बोलली आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने मुव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते असं स्पष्ट केलं होतं. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी कंगनाच्या भीतीवर उत्तर दिलं होतं. त्यांनी ट्वीट करत लिहिलं की, 'प्रिय कंगना, मुंबई हे असे शहर आहे जेथे तुमचं बॉलीवूड स्टार होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. अशात तुझ्याकडून या शहराबद्दल काही आदराचे शब्द ऐकण्याची सगळ्यांची अपेक्षा होती. तू मुंबईची तुलना पीओकेशी केली याबद्दल वाईट वाटलं.' यानंतर कंगनानेही तिच्या बहुचर्चित शैलीत रेणुका शहाणे यांच्या ट्वीटला प्रत्युत्तर दिलं आहे. तिने ट्वीट करत म्हटलं की, 'प्रिय रेणुका जी, एखाद्या ठिकाणच्या प्रशासनाची निंदा करण्याचा अर्थ त्या ठिकाणाची निंदा करणं कधीपासून झालं? मला विश्वास बसत नाही की इतरांप्रमाणे तुम्हीही माझं मांसाचा लचका तोडण्याची वाट पाहत होता. मला तुमच्याकडून अधिक चांगल्याची अपेक्षा होती.' कंगना रणौतने तिला बॉलिवूडच्या ड्रग लिंकबद्दल बरच काही माहीत असल्याचं सांगितलं होतं. यासाठी तिने नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोची मदत करायची तयारीही दर्शवली होती. पण यासाठी तिने संरक्षण मागितलं होतं. यानंतर भाजप नेते राम कदम यांनी महाराष्ट्र सरकारला ट्वीट करून कंगनाला अजून संरक्षण का दिलं नाही असा सवालही केला होता. यावर कंगनाने तिला मुंबई पोलिसांची भीती वाटत असून केंद्र किंवा हिमाचल प्रदेशकडून सुरक्षा हवी असल्याचं सांगितलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lQkhqT