Full Width(True/False)

ड्रग डीलरने केलं मान्य, सुशांतच्या मृत्यूनंतरही शौविकने घेतले ड्रग

मुंबई- प्रकरण आता हत्या, आत्महत्येपेक्षा ड्रग रॅकेटमध्ये असलेल्या लोकांचा चेहऱ्या समोर आणणारं प्रकरण होत चाललं आहे. सीबीआय सुशांतच्या मृत्यूचं सत्य शोधण्यात गुंतलं असताना या प्रकरणात अमली पदार्थांची चौकशी करण्यात नारकोटिक्स ब्युरो गुंतलं आहे. ‘टाइम्स नाऊ’ च्या वृत्तानुसार अटक केलेला आरोपी ड्रग पेडलर झैद विलात्राने चौकशी दरम्यान त्याने जुलैच्या शेवटीही सॅम्युअल मिरांडाला ड्रग्ज दिल्याची कबुली दिली. हे ड्रग्ज विकत घेण्यासाठी शौविक चक्रवर्ती याने पैसे दिल्याचंही तो म्हणाला यांनी पैसे दिले होते. झैद घ्यायचा रोख रक्कम, अब्दुलला करायचा गूगल पे 'टाइम्स नाऊ'ला एनसीबीशी संबंधित लोकांनी सांगितलं की झैदने सुशांतच्या मृत्यूनंतरही सॅम्युअलला ड्रग्ज दिले होते. शौविकने त्याला त्यासाठी रोख रक्कम दिली होती. चौकशी दरम्यान झैदने हेही सांगितलं की तो सगळे व्यवहार रोख रकमेवर करायचा आणि तो अब्दुल बासितला गूगल पे करायचा. सॅम्युअलला ड्रग्जचं पाकीट देण्यात यायचं. त्यामुळे अनेकदा सॅम्युअलद्वारेच रोख पैसे दिले जायचे. मार्चमध्ये, सॅम्युअल म्हणाला - गोव्यातून एक मोठा माल आणायचा आहे सॅम्युअलने मार्च महिन्यात झैदला गोव्यात जाण्यास सांगितलं होतं. गोव्याहून एक महत्त्वाचा माल आणण्याबद्दल सॅम्युअल बोलला होता. झैदने हेही मान्य केलं की तो स्वतः ड्रग्ज घेतो. पण या संपूर्ण प्रकरणात तो फक्त ट्रान्सपोर्टर होता. तो अब्दुल बासितला पैसे द्यायचा आणि त्याच्याकडून माल सॅम्युअलला द्यायचा. गोव्यात, गौरव आर्यापर्यंत पोहोचू शकते चौकशी रियाच्या ड्रग चॅटमध्ये गोव्याचा व्यावसायिका गौरव आर्याचंही नाव समोर आलं. याबद्दल ईडीनेही गौरव आर्याची दोन दिवस चौकशी केली होती. एनसीबीच्या चौकशीतही आता गोव्याचा उल्लेख आला. यावरून एनसीबी गौरव आर्याची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची शक्यता आहे. वांद्रे येथून एनसीबीने केली अटक नारकोटिक्स ब्युरोने झैद विलात्रा आणि अब्दुल बासित परिहार यांना वांद्रे भागातून ताब्यात घेतले. न्यायालयाने दोन्ही आरोपी ड्रग पेडर्सना ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी रिमांडवर पाठवले आहे. शुक्रवारी सकाळी ६.४० वाजता एनसीबीच्या पथकाने शौविक आणि सॅम्युअलच्या घरावर छापा टाकला. शौविक आणि सॅम्युअल दोघांनाही एनसीबी कार्यालयात नेण्यात आले असून तिथे दोघांचीही चौकशी सुरू आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hZEg43