Full Width(True/False)

जिओचा ४४४ रुपयांचा प्लान, ११२ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः रिलायन्स जिओकडे असे अनेक रिचार्ज प्लान आहेत. ज्यात २ जीबी डेटा रोज दिला जातो. जिओकडे २५९९ रुपये, २३९९ रुपये,५९९ रुपये, ४४४ रुपये आणि २४९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये २ जीबी डेटा रोज दिला जातो. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी ४४४ रुपयांच्या पॅकसंबंधी माहिती सांगणार आहेत. या प्लानध्ये कोणकोणते फायदे आहेत, त्याची माहिती सांगत आहोत. वाचाः वाचाः जिओचा ४४४ रुपयांचा रिचार्ज पॅक ४४४ रुपयांचा जिओ प्रीपेड प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. या पॅकमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ११२ जीबी डेटा दिला जातो. रोज मिळणाऱ्या डेटाची लिमिट संपल्यानंतर 64Kbps ची स्पीडने डेटा खर्च केला जावू शकतो. या प्लानमध्ये जिओ ते जिओ वर अनलिमिटेड आणि जिओवरून अन्य नेटवर्कवर कॉलिंग साठी २००० कॉलिंग मिनिट्स ऑफर केले जाते. या पॅकमध्ये रोज १०० एसएमएस फ्री दिले जाते. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः याशिवाय, २४९ रुपयांच्या रिचार्ज पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. या पॅकमध्ये २ जीबी डेटा रोज मिळतो. याप्रमाणे यात एकूण ५६जीबी डेटा मिळतो. तर ५९९ रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये १६८ जीबी, २३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ७३० जीबी आणि २५९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये एकूण ७४० जीबी डेटा मिळतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h0lUif