Full Width(True/False)

बालसुब्रमण्यम यांची 'ही' इच्छा कधीही पूर्ण होऊ शकली नाही

मुंबई: सुप्रसिद्ध पार्श्वगायक यांच्या निधनानं संगीत क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असून त्यांची उणीव भरून निघणं अशक्य असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. १६ भाषांमध्ये ४० हजारांहून अधिक गाणी गाणाऱ्या बालसुब्रमण्यम यांची एक इच्छा मात्र कधीही पूर्ण होऊ शकली नाही. बालसुब्रमण्यम हे देखील यांचे मोठे चाहते होते. बालसुब्रमण्यम यांना मोहम्मद रफी यांच्यासोबत एखाद्या चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्याची खूप इच्छा होती. परंतू ही त्यांची इच्छा कधीही पूर्ण होऊ शकली नाही. एका मुलाखतीत त्यांनी त्याच्या इच्छेबद्दल खुलासा केला होता.'मी रफी साहेबांचा प्रचंड मोठा चाहता आहे, पण त्यांच्यासोबत गाण्याची कधी संधीच मिळाली नाही, त्याची खंत वाटते', असं बालसुब्रमण्यम यांनी सांगितलं होतं.तसंच मोहम्मद रफी यांचं 'तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है...' त्यांच्या प्रचंड आवडीचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मोहम्मद रफी एकदा तेलुगू चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी आले असताना बालासुब्रमण्यम आणि त्यांची भेट झाली होती, हा प्रसंगी त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितला होता.त्यावेळी सराव सुरू असल्यामुळं बालासुब्रमण्यम त्यांच्या पायांना स्पर्श करून आले होते, असंही त्यांनी सांगितलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3i1FWcK