Full Width(True/False)

बालसुब्रमण्यम आणि सलमान खान; 'हे' होतं खास कनेक्शन

मुंबई: यांच्या निधनानं सिने तसंच संगित क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सुरांचा बादशहा बालसुब्रमण्यम यांच्या निधनानं सिनेसंगित क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. त्याच्या आवाजाची जादू रसिक प्रेक्षक कधीही विसरू शकणार नाहीत. बालसुब्रमण्यम यांना ‘बालू’ म्हटले जातं होतं. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील नल्लोर जिल्ह्यात झाला होता. त्यांच्या वडीलांची रंगभूमिशी नाळ जोडली होत. त्यांच्या वडिलांकडूनच त्यांना कलेचं बाळकडू मिळालं. त्यानंतर त्यांनी संगितक्षेत्रातचं करिअर करण्याचा निर्णय घेतला. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असतनाचा त्यांनी संगिताचे धडे घेणं सुरू केलं होतं. त्यांच्या आवाजाला पहिलं बक्षिस मिळालं ते तेलुगू कल्चर संस्थेतील संगीत स्पर्धेत. त्यानंतर १९६६ साली बालसुब्रमण्यम यांना ‘श्री श्री श्री मर्यादा रमन्ना’ या चित्रपटात गाण्यासाठी पहिली संधी मिळाली होती. त्यानंतर केवळ आठ दिवसातच त्यांना इतर भाषेतील चित्रपटांत गाणी गाण्यासाठी ऑफर्स येऊ लागल्या. तेलगू आणि तामिळ चित्रपटात गाणी गायल्यानंतर ‘एक-दूजे के लिए’या हिंदी चित्रपटासाठी गाणी गाण्यासाठी त्यांना संधी मिळाली. त्यांच्या आजावाजाची जादू अशी चालली की, या चित्रपटातील सर्व गाणी हीट ठरली होती. , याच चित्रपटासाठी उत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना मिळाला होता. सलमानचा आवाज सलमानच्या करिअरच्या सुरुवातीला त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये बालासुब्रमण्यम यांनीच पार्श्वगायन केलं होतं. सलमानच्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटातील अनेक गाणी त्यांनी गायली .'आते जाते', 'कबूतर जा जा', 'आजा शाम होने आई', 'मेरे रंग में रंगने वाली'ही गाणी त्यांनी गायली होती. 'दिल दीवाना बिन सजना के माने ना' या गाण्यासाठी त्यांना सर्वौत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार मिळाला होता. तसंच 'हम आप के है कौन' या चित्रपटातील 'दीदी तेरा देवर दीवाना'साठी फिल्मफेअरचा विशेष पुरस्कारदेखील मिळाला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36732fu