Full Width(True/False)

प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं निधन

चेन्नई: भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक यांचं आज निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र, कालपासून त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. बालसुब्रमण्यम यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह देखील आला होता. करोवर मात केल्यानंतरही त्यांच्या तब्येतीत हवी तशी सुधारणा होत नसल्याचं सांगण्यात आलं होतं. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सिनेसंगितात बालसुब्रमण्यम यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. त्यांचं नाव अत्यंत अदबीनं घेतलं जात होतं. त्याच्या आवाजाची वेगळीच जादू प्रक्षेकांनी आणि रसिकांनी अनुभवली आहे. पत्थर के फूल, हम आप के है कौन, बागी, साजन, रोजा अशा अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे ९० च्या दशकात अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांमध्ये बालसुब्रमण्यम यांनीच प्रार्श्वगायन केलं होतं. त्यामुळं सलमान खानचा आवाज म्हणूनही त्यावेळी त्यांना म्हटंल जात होतं. केवळ गायन नव्हे तर अभिनयाची देखील बालसुब्रमण्यम यांना प्रचंड आवड होती. हम से है मुकाबला या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. इलया राजा, ए.आर. रेहमान, नदीम-श्रवण, जतीन ललीत आदी अनेक संगीतकारांकडं त्यांनी काम केलं आहे. हिंदीसह तमीळ, तेलुगु, मल्याळम आदी भाषांत चाळीस हजारांहून अधिकगाणी गायली आहेत. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RZzJn4