Full Width(True/False)

फोन क्लोनमधून 'या' धक्कादायक गोष्टींचा खुलासा; रियाच्या अडचणी वाढणार

मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यू प्रकरणात एनसीबीनं धडक कारवाई करत हिचा भाऊ याला आणि यांना अटक केल्यानंतर आता रियाच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून रियाला चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे. सुशातच्या मृत्यू प्रकरणात ड्रग अॅंगल आल्यानंतर तपासाचा वेग वाढला आहे. यादरम्यान रियाचा फोन क्लोन करण्यात आला आहे. यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमली पदार्थांची अवैध खरेदी-विक्रीसंदर्भात धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान, रियानं दिलेल्या एका मुलाखतीत तिनं कधीही ड्रग्ज घेतले नसल्याचं म्हटलं होतं. पण सुशांत ड्रग्ज घेत होता, असं तिनं म्हटलं होतं, त्यामुळं आता रियाच्या चौकशीत नेमकं काय समोर येतंय ते महत्त्वाचं ठरणार आहे. सुशांतच्या मृत्यूचं कोडं सोडवण्यात अद्यापही सीबीआयला यश आलं नाहीये. हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकनं ड्रग्ज विकत घेतले असल्याचं चौकशीतून समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वीच एनसीबी पथकानं झैद विलात्रा आणि अब्दुल परिहार या ड्रग्स पॅडलरला ताब्यात घेतलं होतं. या दोघांचीही चौकशी केल्यानंतर जुलैमहिन्यात सॅम्युअल मिरांडाला ड्रग्ज दिल्याची कबुली दिली होती तर हे ड्रग्ज विकत घेण्यासाठी शौविक चक्रवर्तीनं पैसे दिल्याचं कबुल केलं होतं. न्यायालयानं दोन्ही आरोपींना ९ सप्टेंबरपर्यंत रिमांडवर पाठवलं होतं. सुशांतच्या वडिलांनी दिली सक्त ताकीद राजपूत प्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्याच्या जीवनप्रवासावर चित्रपट तयार करण्यासाठी सिनेनिर्मात्यांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. पण, सुशांतच्या कुटुंबियांनी यावर आक्षेप घेतला आहे. चित्रपट, वेब सीरिज किंवा पुस्तक यातील कोणतीच कलाकृती सुशांतच्या नावाने सध्या तयार केली जाऊ नये; असं त्यांनी नमूद केलं आहे. सुशांतच्या आत्महत्येचं प्रकरण सध्या तपासासाठी 'सीबीआय'कडे असलं, तरी सोशल मीडियावर या घटनेशी निगडित विविधांगी चर्चा सुरू आहे. इंडस्ट्रीमध्येही याचे पडसाद उमटले असून, घराणेशाही, गटबाजीच्या मुद्द्यांवरुन घमासान होतंय. हे सर्व प्रकरण एका चित्रपटाच्या कथेला साजेसं असल्याचं बोललं जातंय. अनेकांनी या घटनेवर आणि त्यांच्या जीवनातील चढ-उतारांवर चित्रपटच तयार करण्याचं योजलं आहे. त्यासाठी वेगानं हालचाली सुरू आहेत. सिनेमाच्या नावाची नोंदणी करून घेण्यासाठी सिनेनिर्मात्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळतेय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31YavLA