नवी दिल्लीः वर्क फ्रॉम होमच्या दरम्यान मोबाइल डेटा जास्त लागत आहे. त्यामुळे रोज १.५ जीबी आणि २ जीबी डेटा अनेकदा अपुरा पडतो. त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला रोज ३ जीबी डेटा प्लान घ्यायचा असेल तर त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतील. परंतु, आम्ही तुम्हाला या ठिकाणी तीन प्लानसंबंधी माहिती देणार आहोत. जे २ जीबी डेटाच्या किंमतीत ४ जीबी डेटा ऑफर करतात. हे तिन्ही प्लान Vodafone-Idea चे आहेत. वाचाः वाचाः म्हणून मिळतोय ४ जीबी डेटा आपल्या काही प्लान्सवर डबल डेटा ऑफरची सुविधा देत आहे. आधी कंपी १.५ जीबी डेटाच्या प्लानमध्ये ३ जीबी डेटा देत होती. परंतु, आता रोजी २ जीबी डेटाच्या प्लानमध्ये डबल डेटा म्हणजेच ४ जीबी डेटा दिला जात आहे. २९९ रुपयांचा प्लान वोडाफोन-आइडियाच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. रोज ४ जीबी डेटा दिला जातो. या प्रमाणे ग्राहकांना एकूण ११२ जीबी डेटाचा वापर करता येतो. तसेच याशिवाय रोज १०० एसएमए आणि वोडाफोन प्ले आणि झी ५ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः ४४९ रुपयांचा प्लान हा २९९ रुपयांचा प्लान आहे. यात दुप्पट वैधता मिळते. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. रोज ४ जीबी डेटा मिळतो. याप्रमाणे युजर्संना एकूण २२४ जीबी डेटाचा वापर करू शकतात. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग,रोज १०० एसएमएस आमि वोडाफोन प्ले आणि झी ५ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. ६९९ रुपयांचा प्लान वोडाफोन-आयडियाचा ६९९ रुपयांचा प्लानमध्ये युजर्संना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड क़ॉलिंगची सुविधा मिळते. प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. रोज ४ जीबी डेटा दिला जातो. या प्रमाणे युजर्संना एकूण ३३६ जीबी डेटाचा वापर केला जातो. याशिवाय रोज १०० एसएमएस आणि वोडाफोन प्ले आणि झी ५ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lU6Jus