मुंबई: गेली अनेक वर्षे आपल्या सुरेल आवाजाने कोट्यवधी संगीतरसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या यांच्या जीवनप्रवासावर एक नजर...
- २८ सप्टेंबर १९२९साली मध्य प्रदेशमधील इंदूरयेथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. लतादीदी यांना गाण्याचा वारसा त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून लाभला.
- लतादीदी यांचं नाव हेमा असं ठेवण्यात आलं होतं. पण, दीनानाथ मंगेशकर यांच्या ' भावबंध' या नाटकातील 'लतिका' या पात्राच्या नावावरुन त्यांनी हेमा नाव बदलून 'लता' असं ठेवलं.
- वडिलांच्या निधनानंतर लतादीदी कुटुंबासोबत मुंबईत स्थायिक झाल्या. मुंबईत आल्यानंतर त्यांनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून शास्त्रीय गायनाचं शिक्षण घेतलं.
- गायनाबरोबरच लतादीदींनी अभिनयाची आवडही जोपासली. 'पहिली मंगळागौर' या मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे.
- लतादीदींनी पहिलं गाणं १९४२मध्ये एका मराठी चित्रपटात गायलं होतं. पण, काही कारणास्तव ते गाणं चित्रपटातून काढून टाकण्यात आलं.
- 'महल' चित्रपटातील 'आएगा आने वाला' या गाण्यानं लतादीदींना प्रसिद्धी मिळवून दिली.
- लता दीदी यांनी हजारो गाणी गायली आहेत तर ३६हून अधिक भाषांमध्ये पार्श्वगायन केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/345qvLn