मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यूचा तपास देशातील तीन महत्त्वाच्या यंत्रणांकडून केला जात आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने () सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री हिला अटक केली आहे. सुशांतसाठी ड्रग मागवल्याचं आणि ड्रग्ज घेतल्याचं मान्य केल्यानंतर रियाला अटक करण्यात आल्याची माहितीNCB च्या सूत्रांनी दिली आहे. रियला अटक केल्यानंतर आता वैद्यकीय तपासणीसाठी तिला सायन रुग्णालायत घेऊन जाण्यात आलं आहे. तिथं रियाची करोना चाचणीही करण्यात येणार आहे. त्यानंतर रियाला आज सायंकाळी ७.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती आहे. मृत्यू प्रकरणात नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोनेदेखील ( ) विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केलं आहे. अभिनेत्री , तिचा भाऊ व तसंच अन्य संबंधितांशी संबंधित अमली पदार्थ प्रकरणाचा हे पथक तपास करणार आहे. या चौकशीदरम्यान रियानं मोठा खुलासा केला आहे. ईडी, सीबीआय चौकशीत कधीही ड्रग्ज न घेतल्याचं सांगितलेल्या रियानं ड्रग्ज घेतल्याचं एनसीबीच्या चौकशीत मान्य केलं आहे. इतकंच नाही तर याचं खापर तिनं सुशांतवर फोडलं आहे. रिया चक्रवर्ती ही भाऊ शौविक व सॅम्युएल मिरांडा यांच्या सहकार्यानं सुशांतला अमली पदार्थ देत होती, असं सीबीआयच्या तपासात समोर आलं आहे. यामुळंच या तपासात एनसीबीनंही उडी घेतली आहे. एनसीबीनं आठवडाभरात कारवाई करून तीन मोठ्या अमली पदार्थ दलालांना अटक केली. हे दलाल शौविक व सॅम्युएलच्या संपर्कात होते, असे त्यांनीच सांगितलं. या सर्वांचा तपास करण्यासाठी एनसीबीनं एसआयटीची स्थापना केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZjUAFx