Full Width(True/False)

NCB च्या अखेरच्या चौकशीत रियाने घेतली २५ सेलिब्रिटींची नावं

मुंबई- प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने () अमली पदार्थांच्या देवाण- घेवाणबद्दल अनेक खुलासे केले. रविवारी आणि सोमवारी एनसीबीच्या चौकशीत तिच्या विधानावर ठाम होती. मात्र मंगळवारी तिचा संयम तुटला. अखेर तिने फक्त स्वतः ड्रग्ज घेतल्याचं मान्य केलं नाही तर बॉलिवूडमधील अन्य बड्या सेलिब्रिटींचीही नावं तिने यात घेतली, जे अमली पदार्थ घेण्यात अजूनही सक्रीय आहेत. रियाने केला २५ बॉलिवूड स्टारच्या नावांचा खुलासा एनसीबीने रियाच्या केलेल्या तीन दिवसांच्या चौकशीत बॉलिवूडमध्ये पसरलेल्या ड्रग्जच्या मायाजाळचे दुवे सापडत आहेत. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, रियाने या चौकशीत फक्त ड्रग्ज वापरल्याची कबुली दिली नाही तर ड्रग्ज घेत असलेल्या अन्य २५ बॉलिवूड सेलिब्रिटींचीही नावं सांगितली. आता हे २५ स्टार स्टार्सही एनसीबीच्या रडारवर आले आहेत त्यांनाही आता लवकरच चौकशीसाठी समन्स पाठवला जाऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक डिवाइसमधून झाला खुलासा अहवालात म्हटलं आहे की रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती यांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप फॉरेन्सिक तपासणीला पाठवण्यात आले होते. यात रिया आणि शौविक २०१७ पासून ड्रग गेममध्ये सामिल असल्याचं दिसून आलं. दोघांचे फोन कॉल, चॅट्स आणि मेसेजवरून रिया अनेक ड्रग्ज डीलरच्या संपर्कात असल्याचं कळलं. रियाने यापूर्वीच्या चौकशीत मान्य केलं होतं की ती ड्रग्ज सुशांतसाठी विकत घेत होती. रिया म्हणाली- सुशांतने तिला ड्रग्ज घ्यायला परावृत्त केलं रियाने आजच्या एनसीबीच्या चौकशीत तीही अमली पदार्थांचं सेवन करत असल्याचं मान्य केलं. यापूर्वीच्या जबाबात रियाने फक्त सुशांतसाठीच ड्रग्ज घेतल्याचं सांगितलं होतं. पण आज तिने आपला जबाब बदलतं. तीही अमली पदार्थांचं सेवन करत असल्याचं कबुल केलं. पण सुशांतने तिला जबरदस्ती केल्यामुळेच तिने हे ड्रग्ज घेतल्याचं पुढे म्हटलं. रियाशिवाय शौविक, सॅम्युल आणि दिपेश यांनीही सुशांतसाठी ड्रग्स विकत घेतल्याचं मान्य केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bCAbjQ