मुंबई- सुनील ग्रोव रचं विनोदाचं टायमिंग आणि त्याला असलेली विनोदाची जाण किती जबरदस्त आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. तो कोणत्याही व्यक्तीची कॉपी अगदी सहज करू शकतो. प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात त्याचा हातखंडा आहे. टीव्हीवर डझनभर वेगवेगळ्या विनोदी भूमिका साकारलेल्या सुनीलने नुकतीच 'टोपी बहू' ही साकारली. सध्या त्याचा टोपी बहूचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. कोकिलाबेन, राशी बेन आणि गोपी बहु या 'साथ निभाना साथिया' मालिकेतील पात्रांची सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्या तिघींचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर रसोडे मैं कौन था हा हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये आला होता. हे पाहताच सुनील ग्रोवरने आपल्या कॉमेडी शो 'गँग्ज ऑफ फिल्मिस्तान' साठी एक गॅग प्लॅन तयार केला. यात त्याने गोपी बहूची नक्कल करणार टोपी बहू हे कॅरेक्टर साकारलं. याचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. आधीच्या प्रोमोमध्ये टोपी बहू ही गोपीसारखीच लॅपटॉप धुताना दिसली होता. आता ती मजेशीर पद्धतीने मेकअप करताना दिसेल. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुनील ग्रोवर सुरुवातीला पेपरला मेकअप करते आणि मग तोच पेपर चेहऱ्याला लावते. त्या पेपरवर रेखाटलेला मेकअप तिच्या चेहऱ्याला लागतो. याचप्रमाणे तो कागदावर कुंकू काढतो आणि नंतर तो कागद डोक्याला लावतो. हे कमी की काय यानंतर 'टोपी बहु' अर्थात सुनील ग्रोवर कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये काही कपडे टाकतो. नंतर तो स्वत:ही मशीनच्या आत जातो आणि मशीन सुरू करतो. कपड्यांसोबत तोही धुतला जातो. हा संपूर्ण प्रोमो पाहून कोणीह त्यांचं हसू रोखू शकणार नाही. 'साथ निभाना साथिया'मध्ये गोपी बहूची भूमिका साकारणारी देवोलीना भट्टाचार्यनेही ट्वीटरवर सुनील ग्रोवरच्या या प्रोमोवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'साथ निभाना साथिया २' मालिकेवर सध्या काम सुरू आहे. त्यासाठीचीही चांगली कल्पना आहे. गोपी बहू आणि तुझ्यात तगडी स्पर्धा होईल. सध्या निर्माते 'साथ निभाना साथिया २' घेऊन येत आहेत, यामध्ये देवोलीना गोपी बहु आणि रूमल पटेल या कोकिलाबेनच्या भूमिकेत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mA2vZg