मुंबई- सध्या त्याच्या आगामी 'राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई' या सिनेमाची तयारी करत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो पनवेल येथील फार्महाऊसवर आहे. नुकताच सलमानने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो वर्कआउट करताना दिसत आहे. त्याचं हे वर्कआउट पाहून वाढतं वय हा फक्त अंकच असतो यावर तुमचा विश्वास बसेल. कारण ५४ व्या वर्षी सलमानचं वर्कआउट आणि त्याचे कठोर परिश्रम पाहून २४ वर्षांचा तरुणही स्तब्ध होईल. सिनेमाचं चार ते पाच दिवसांचं चित्रीकरण बाकी सलमानच्या फार्महाऊसमध्ये जिमचा संपूर्ण सेटअप आहे. त्याच्या '' सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण व्हायला अजून चार ते पाच दिवसच लागतील. अलीकडेच सिनेमाच्या डबिंगलाही सुरुवात झाली होती. रणदीप हूडाने डबिंगचे फोटो शेअर केले होते. सिनेमाच्या क्लायमॅक्स सीनच्या काही भागांचं शूटिंग बाकी असल्याचं बोललं जात आहे. या वयातही सलमान खान बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. बी- टाउनमध्ये बॉडी बिल्डिंगची क्रेझ सुरू करणारा सलमान व्हिडिओमध्ये अनेक किलोंचं वजन अगदी सहजपणे उचलून व्यायाम करताना दिसतो. त्याचे मसल्स पाहूनच त्याचा व्यायाम किती कठीण असेल याचा अंदाज येतो. 'बिग बॉस १४' रिअॅलिटी शोची सुरुवात ३ ऑक्टोबरपासून सलमान खानने नुकताच आपला फिटनेस ब्रँड 'बीइंग स्ट्रॉंग' देखील बाजारात आणला आहे. याअंतर्गत सलमान जिम मशीनची विक्री करतो. या ब्रँडच्या काही जिमही आहेत. 'बिग बॉस' च्या १४ व्या सीझनसह सलमान खान लवकरच टीव्हीवर पुन्हा पाहायला मिळणार आहे. हा शो ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यावर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने सलमान खानचा 'राधे' सिनेमा प्रदर्शित होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. 'राधे' हा २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वांटेड' सिनेमाचा सिक्वल आहे. प्रभू देवा या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cbtu8X